सुप्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 12:58 IST2024-10-20T12:58:08+5:302024-10-20T12:58:44+5:30

मख्खी, दबंग फेम लोकप्रिय अभिनेत किच्चा सुदीपच्या आईचं दुःखद निधन झालंय (kiccha sudeep)

actor Kiccha Sudeep Anna mother Saroja Amma is Passed away at the age of 83 | सुप्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सुप्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दाक्षिणात्य सिनेमे गाजवणारा आणि बॉलिवूडमध्येही काम करणारा लोकप्रिय अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं दुःखद निधन झालंय. त्या ८३ वर्षांच्या होत्या. सरोजा संजीव असं त्याच्या आईचं नाव असून आईच्या निधनामुळे अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किच्चाची आई सरोजा गेल्या अनेक वर्षांपासून आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज सरोजा संजीव यांनी अखेरचा श्वास घेतला. 

किच्चा सुदीपच्या आईचं निधन

ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, करवा चौथच्या दिवशी अर्थात २० ऑक्टोबरला किच्चाच्या आईने अखेरचा श्वास घेतला. बंगळुरु येथील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आईच्या निधनामुळे किच्चा आणि त्याचं संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सरोजा शारीरिक व्याधींनी ग्रस्त होत्या. त्या कायम डॉक्टरांच्या देखरेखीखाली असायच्या. किच्चाचे फॅन्स सोशल मीडियावर त्याच्या आईला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

कधी होणार अंत्यंसस्कार

किच्चा सुदीपच्या आईचं पार्थिव आज बंगळुरु येथील जेपी नगरमध्ये अभिनेत्याच्या घरी अंतिम दर्शनासाठी आणलं जाईल. किच्चाचे जवळते मित्र, नातेवाईक आणि मनोरंजन विश्वातील कलाकार किच्चाच्या आईचं अंतिम दर्शन घेतील. पुढे संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सरोजा संजीव यांच्यावर विल्सन गार्डन येथे अंतिम संस्कार केले जातील. किच्चा आणि त्याच्या कुटुंबासाठी हा दुःखद प्रसंग असून सर्वजण त्याला धीर देत आहेत

Web Title: actor Kiccha Sudeep Anna mother Saroja Amma is Passed away at the age of 83

टॅग्स :TollywoodTollywood