"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:07 IST2025-04-17T12:06:46+5:302025-04-17T12:07:06+5:30

सुशीला सुजीत सिनेमा पाहून सोनाली कुलकर्णीने दिलेली खास प्रतिक्रिया चर्चेत आहे (sonali kulkarni)

Sonali Kulkarni reaction after watch sushila sujeet marathi movie prasad oak swapnil joshi | "मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?

"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?

सध्या मराठी मनोरंजन विश्वात एका आगळ्यावेगळ्या सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमाचं नाव म्हणजे 'सुशीला सुजीत'. हा सिनेमा उद्या म्हणजेच १८ एप्रिलला रिलीज होणार आहे. सर्वांनाच या सिनेमाची उत्सुकता आहे. प्रसाद ओकने (prasad oak) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni) आणि स्वप्नील जोशी (swapnil joshi) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचं खास स्क्रीनिंग नुकतंच झालं. त्यावेळी सोनालीने स्वतःचा सिनेमा पाहून दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

'सुशीला सुजीत' पाहून सोनाली काय म्हणाली

'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णीने प्रसादच्या गालावर किस केल्याचा गंमतीशीर फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. याशिवाय सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबतचे फोटो पोस्ट करुन सोनाली लिहिते की, बघितली मी माझी फिल्म..!!! It’s fab.. अप्रतिम ..!!!!!!!!!!!!! मी एवढी हसले.. I love you प्रसाद 😘 ( with proof 😜 ) स्वप्नी……..ल 🤗🤗🤗 सुनिल, रेणू and the entire cast..💖 Our music, lyrics.. 🥰 संजय मेमाणे 🥹 मित्रांनो.. do watch सुशीला सुजीत 🥰 don’t miss !" अशाप्रकारे मोजक्या शब्दात सोनालीने तिचा आनंद व्यक्त केलाय.


'सुशीला सुजीत' सिनेमाबद्दल

स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आणि त्यांचे पहिल्यांदाच एकत्र येणे, यामुळे चर्चेत असलेल्या "सुशीला सुजीत" सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांना सिनेमातील उंची निर्मितीमूल्ये, दमदार अभिनय, खुमासदार प्रसंग आणि खिळवून ठेवणारे संवाद ही "सुशीला-सुजीत"ची वैशिष्ट्ये अधोरेखित होतात. हा चित्रपट १८ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

Web Title: Sonali Kulkarni reaction after watch sushila sujeet marathi movie prasad oak swapnil joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.