सोनाक्षी यू आर ग्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:56 IST2016-01-16T01:18:15+5:302016-02-06T13:56:00+5:30

'द बंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा आता इंडस्ट्रीत बर्‍यापैकी स्थिरस्थावर झाली आहे. यशाची चव चाखलेल्या सोनाक्षीचे पाय मात्र अजूनही जमिनीवरच ...

Sonakshi you're great! | सोनाक्षी यू आर ग्रेट!

सोनाक्षी यू आर ग्रेट!

'
;द बंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा आता इंडस्ट्रीत बर्‍यापैकी स्थिरस्थावर झाली आहे. यशाची चव चाखलेल्या सोनाक्षीचे पाय मात्र अजूनही जमिनीवरच आहेत. कितीही मोठे झालो तरी आपल्या पालकांसाठी आपण लहानच आहोत हे सोनाक्षीने दाखवून दिले आहे. त्याचे झाले असे की, नुकत्याच एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सोनाक्षी म्हणाली की,'आजही ती तिला मिळालेले मानधनाचे सगळे चेक तिच्या आई-वडीलांकडे जमा करते, तिच्या गरजा खूप कमी आहेत त्यामुळे गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडून पैसे मागून घेते. कॉलेजमध्ये असताना एका फॅशन वीकसाठी तिला ३000 रूपये मिळाले होते. ही तिची पहिली कमाई होती. तेव्हा तिच्या आईने हा चेक फ्रेम करून ठेवला होता. तेव्हापासून आजतागायत आपले चेक पालकांकडे जमा करण्याचा तिचा सिलसिला चालूच आहे. पडद्यावर आदर्श मुलीची भूमिका साकारणारी सोनाक्षी वास्तवातही गुणी आहे. सोनाक्षी, यु आर सिम्प्ली ग्रेट !!

Web Title: Sonakshi you're great!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.