दु:खाच्या काळात ‘या’ खास व्यक्तीची सानिया मिर्झाला मोलाची साथ; एका पोस्टने वेधून घेतलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 12:12 PM2024-02-14T12:12:20+5:302024-02-14T12:17:34+5:30

सानियाच्या एका पोस्टने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

Sister Anam Mirza has strong support for Sania Mirza after her divorce with Shoaib Malik shared an emotional post on social media | दु:खाच्या काळात ‘या’ खास व्यक्तीची सानिया मिर्झाला मोलाची साथ; एका पोस्टने वेधून घेतलं लक्ष

दु:खाच्या काळात ‘या’ खास व्यक्तीची सानिया मिर्झाला मोलाची साथ; पोस्ट करत केला खुलासा

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा  ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सानिया मिर्झा हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. सध्या ती आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहे. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे विभक्त झाले आहेत. सानियाला घटस्फोट देत शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. आता यातच सानियाच्या एका पोस्टने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट घेणे सानिया मिर्झा हिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. घटस्फोटामु्ळे सध्याचा काळ सानियासाठी अतिशय कठीण आहे. मात्र या परिस्थितीमध्ये ती एकटी पडलेली नाही. एक खास व्यक्ती या संकटात तिच्या सोबतीला आहे. याच व्यक्तीसाठी सानियानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही व्यक्ती सानियाची बहिण  अनम मिर्झा आहे. 

दु:खाच्या काळात  सानियाला बहिण अनम मिर्झानं मोलाची साथ दिली आहे. सानियानं इंस्टाग्रामवर अनमसोबतचे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं,  ‘ बहिणीच्या कौतुकासाठी ही पोस्ट. माझी रॉक ( भक्कम पाठिंबा), बेस्ट फ्रेंड, विश्वासपात्र, दु:ख कमी करणारी, कठीण परस्थितीत मार्ग शोधणारी व्यक्ती माझी बहिण, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे', असं सानियाने तिच्या पोस्टमध्ये लिहलं आहे. सानियाची ही पोस्ट पाहून अनमही भावूक झाली. यावर 'तुच माझं जग आहेस' अशी कमेंट केली. 

तर सानियाच्या पोस्टवर कमेंट करत तिची आई नसीम मिर्झा यांनी लिहलं,, 'माशाअल्लाह, तुम्ही दोघी नेहमी सोबत राहा, आनंदी राहा आणि असेच एकमेकांनी सपोर्ट करत राहा. माझ्या मुलींनो देव तुम्हाला वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण करेल'. या पोस्टवर सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरनेही हार्ट एमोजी कमेंट केले आहेत. तसेच चाहत्यांनीही या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

सानिया तिच्या बहिणीच्या खूप जवळ आहे. आयुष्यात संतुलन आणण्यात अनम मिर्झाची महत्त्वाची भूमिका असल्याचे तिने अनेकदा सांगितलं आहे. तिनं सानियाला कोणत्याही कठीण प्रसंगी एकटे सोडले नाही. जेव्हा शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्नाची घोषणा केली. तेव्हा सानियाच्या वतीने अनमने अधिकृत निवेदन जारी केलं होतं.

Web Title: Sister Anam Mirza has strong support for Sania Mirza after her divorce with Shoaib Malik shared an emotional post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.