"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:25 IST2025-06-28T11:18:32+5:302025-06-28T11:25:07+5:30
पत्नी शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर तिचा पती पराग त्यागी आणि तिच्या डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झाल्याने सर्वांना धक्का बसला. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने शेफालीने अखेरचा श्वास घेतला. शेफालीच्या मृत्यूनंतर तिचा पती पराग त्यागीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पत्नी शेफालीचं अकस्मात निधन झाल्याने पराग त्यागी प्रचंड भावुक झाला आहे. अशातच शेफालीच्या मृत्यूनंतर परागने पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोठं विधान केलंय. ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं.
पराग पोलिसांना काय म्हणाला?
परागने पोलिसांना केलेल्या विधानात खुलासा केला की, "तिच्यावर आधीपासून उपचार सुरु होते." याशिवाय शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, "गेल्या पाच - सहा वर्षांपासून ती तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती. ती एंटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती. शेफाली दोन औषधं घ्यायची, ज्यात विटामिन सी आणि Glutathione हे घटक समाविष्ट होते. या औषधांचा हृदय विकाराशी काही संबंध नाही. ही औषधं चेहरा उजळ व्हावा म्हणून घेतली जातात. त्यामुळे याचा परिणाम फक्त चेहऱ्यावर होतो. शेफाली खूप फिट होती आणि तिने कधीच कोणत्या आजाराचा उल्लेख केला नव्हता."
शेफालीच्या निधनानंतर पतीची भावुक अवस्था
शेफाली जरीवालाच्या निधनानंतर तिचा पती पराग त्यागीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पराग त्यागी हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो गाडीमध्ये बसलेला दिसतो आहे. पत्नीच्या निधनाने पराग पूर्णपणे कोलमडून गेला आहे. डोळ्यात अश्रू आणि थरथरणारे हात अशा अवस्थेत तो पाहायला मिळतो आहे. पत्नी शेफालीचं जाण्याने रडून रडून त्याची अवस्था वाईट झाली आहे. अनेक जण परागला धीर देत असून त्याचं सांत्वन करत आहेत. पत्नी शेफालीच्या अकस्मात निधनामुळे परागवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.