पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 09:03 IST2025-06-29T09:02:34+5:302025-06-29T09:03:08+5:30
Parag Tyagi on Shefali Jariwala Death : पती पराग त्यागीच्या हातून शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीला शेवटचा निरोप देताना पराग त्यागीला अश्रू अनावर झाले.

पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं शुक्रवारी(२७ जून) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ती ४२ वर्षांची होती. शेफालीच्या अचानक झालेल्या निधनाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शनिवारी(२८ जून) मुंबईत शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफालीला अखेरचा निरोप देण्यासाठी तिचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटी उपस्थित होते.
पती पराग त्यागीच्या हातून शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीला शेवटचा निरोप देताना पराग त्यागीला अश्रू अनावर झाले. तो भावुक झाला होता. शेफालीवर अंत्यसंस्कार करताना पराग धाय मोकलून रडला. पण, त्याच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शेफालीवर अंत्यसंस्कार करण्याआधी परागने तिच्या डोक्यावर किस केलं. परागचं निस्वार्थ प्रेम पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आलं.
शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पराग त्यागी मीडियासमोर आला. त्याने माध्यमांना हात जोडून कृपया याचा ड्रामा करू नका अशी विनंती केली. त्यानंतर तो "माझ्या परीसाठी प्रार्थना करा", असंही म्हणाला. रडून रडून त्याची अवस्था वाईट झाली होती.
'काटा लगा' या गाण्यामुळे शेफालीला प्रसिद्धी मिळाली होती. तिने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं होतं. वेबसीरिजमध्ये शेफाली दिसली होती. 'बिग बॉस १३'मध्येही ती सहभागी झाली होती. शेफालीने अभिनेता पराग त्यागी याच्याशी २०१४ मध्ये लग्न केलं होतं. त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. मात्र, तिच्या अचानक झालेल्या निधनाने पराग आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.