"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 09:32 IST2025-06-29T09:29:55+5:302025-06-29T09:32:59+5:30

Parag Chhabra Predicts Shefali Jariwala Death: काही महिन्यांपूर्वीच शेफालीच्या जवळचा मित्र असलेला अभिनेत्याने तिच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू असल्याचं त्याने म्हटलं होतं. आता शेफालीच्या मृत्यूनंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

shefali jariwala death predict by her friend and actor paras chhabra few months ago | "तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

Shefali Jariwala Death Prediction: 'काटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला हिचं ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तिच्या अचानक झालेल्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. पण, काही महिन्यांपूर्वीच शेफालीच्या जवळचा मित्र असलेला अभिनेत्याने तिच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू असल्याचं त्याने म्हटलं होतं. आता शेफालीच्या मृत्यूनंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

शेफालीने काही महिन्यांपूर्वीच बिग बॉस फेम पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पारस छाबरा शेफालीच्या कुंडलीबाबत सांगताना दिसत आहे. शेफाली म्हणते, "भविष्य आणि अध्यात्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कुठे ना कुठे त्या रिलेटेड असले तरी ते वेगळे आहेत. माझ्या वडिलांना कुंडली वगैरे या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. मूल जन्माला येतं तेव्हा ते त्याचं भविष्य घेऊन येतं, असं त्यांचं म्हणणं होतं. जे काही होतं चांगल्यासाठी होतं. तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही तर तुमचंही होणार नाही, या विचारांचे ते होते. त्यामुळे आम्ही ही त्याच विचाराने मोठे झालो. आजपर्यंत माझी कुंडली बनलेली नाही. त्यामुळे आता तू मला त्याबद्दल काहीतरी सांग". 


त्यानंतर पारस छाबरा शेफालीच्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू असल्याचं सांगतो. तो म्हणतो, "तुझ्या कुंडलीत आठव्या घरात चंद्र, केतू आणि बुध हे तीनही आहेत. चंद्र आणि केतूचं कॉम्बिनेशन सगळ्यात वाईट असतं. चंद्र म्हणजे मन आणि केतूकडे फक्त शरीर आहे. त्यामुळे जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा सगळ्यात वाईट कॉम्बिनेशन असतं. आठवं घर म्हणजे हानी, आकस्मिक मृत्यू, प्रसिद्धी, तांत्रिक गोष्टी. तुझ्या कुंडलीत चंद्र आणि केतू तर वाईट आहेच. पण बुध देखील असल्याने चंद्र आणि बुध एकत्र कधीच येत नाहीत. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा मेंदूशी रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात". 

शेफालीच्या मृत्यूनंतर आता पारस छाबराच्या पॉडकास्टमधील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर पारस छाबराने पोस्ट करत "कुणाचं किती आयुष्य असतं हे कोणालच माहीत नसतं", असं म्हटलं होतं. शेफालीच्या पार्थिवावर शनिवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Web Title: shefali jariwala death predict by her friend and actor paras chhabra few months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.