"ती नेहमीसारखी नायिका किंवा खलनायिका नाही...", अनुजा साठेनं 'महारानी ३'मधील भूमिकेबद्दल केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 09:31 PM2024-02-27T21:31:48+5:302024-02-27T21:32:08+5:30

Anuja Sathe : अनुजा साठेची बहुचर्चित सीरिज 'महारानी'च्या पहिल्‍या दोन सीझन्‍सना भव्‍य यश मिळाल्‍यानंतर 'महारानी ३'चे सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्‍ज आहे.

"She is not the usual heroine or villain...", Anuja Sathe reveals about her role in 'Maharani 3' | "ती नेहमीसारखी नायिका किंवा खलनायिका नाही...", अनुजा साठेनं 'महारानी ३'मधील भूमिकेबद्दल केला उलगडा

"ती नेहमीसारखी नायिका किंवा खलनायिका नाही...", अनुजा साठेनं 'महारानी ३'मधील भूमिकेबद्दल केला उलगडा

पहिल्‍या दोन सीझन्‍सना भव्‍य यश मिळाल्‍यानंतर सोनी लिव्‍ह बहुप्रतिक्षित 'महारानी ३' (Maharani 3)चे सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्‍ज आहे. शोच्‍या पुनरागमनाबाबत चर्चेला उधाण मिळालेले असताना सीझन २ मध्‍ये प्रवेश केल्‍यापासून उत्तम भूमिका साकारलेल्‍या अनुजा साठे(Anuja Sathe)ने किर्ती सिंगच्‍या गुंतागूंतीच्‍या प्रवासाबाबत सांगितले, जेथे ती राजकीय क्षेत्रांमधील आव्‍हाने आणि नैतिक दुविधेचा सामना करते. 

अनुजा साठे म्हणाली की, ''किर्तीची भूमिका अत्‍यंत संयमी, पण साहसी व्‍यक्‍तीची आहे, पण वास्‍तविक जीवनात मी स्‍पष्‍ट बोलणारी आणि खुल्‍या मनाने वागणारी आहे. असा विरोधाभास असताना देखील मला ही आव्‍हानात्‍मक भूमिका साकारण्‍याचा आनंद होत आहे. सुभाष सरांच्‍या मार्गदर्शनासह मी किर्तीच्‍या भूमिकेला वास्‍तविकतेत आणू शकले. तसेच, मी माझे संवाद प्रशिक्षकांचे देखील आभार मानते, ज्‍यांनी मला बिहारी भाषा शैलीमध्‍ये पारंगत होण्‍यास मदत केली, जेथे सुरूवातीला मला त्‍यासंदर्भात संघर्ष करावा लागला." 

अनुजा पुढे म्‍हणाली, ''किर्तीच्‍या प्रवासाबाबत रोचक बाब म्‍हणजे ती सुष्‍ट व दुष्‍ट गोष्‍टींमध्‍ये सुरेख एकोपा साधते. ती नेहमीसारखी नायिका नाही आणि खलनायिका देखील नाही. ती दोघींचे मिश्रण आहे, ज्‍यामुळे ही भूमिका अधिक लक्षवेधक आहे. किर्तीची गाथा सादर करण्‍याचा अनुभव आव्‍हानात्‍मक व लाभदायी राहिला आहे आणि मी सर्वांना आमची अथक मेहनत व समर्पितता पाहताना बघण्‍यास अत्‍यंत उत्‍सुक आहे.''  

या सिरीजचे निर्माते नरेन कुमार व डिम्‍पल खारबंदा यांच्‍यासह निर्मिती सुभाष कपूर यांची आहे आणि दिग्‍दर्शन सौरभ भावे यांचे आहे. सुभाष कपूर व नंदन सिंग यांनी लेखन केलेल्‍या या रोमांचक कथानकामध्‍ये ह्युमा कूरेशी, अमित सियाल, विनीत कुमार, प्रमोद पाठक, कानी कुश्रुती, अनुजा साठे, सुशील पांडे, दिब्‍येंदू भट्टाचार्य आणि सोहम शाह प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 'महारानी ३' ७ मार्चपासून फक्‍त सोनी लिव्‍हवर पाहायला मिळेल.

Web Title: "She is not the usual heroine or villain...", Anuja Sathe reveals about her role in 'Maharani 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.