अंशुमन जोशी 'शाळा' सिनेमानंतर मराठीमध्ये का दिसला नाही? 'त्या' प्रश्नावर अभिनेता म्हणाला-"आता माझं प्राधान्य..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:34 IST2026-03-20T15:18:45+5:302026-03-20T15:34:47+5:30

मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही अंशुमन जोशी? अभिनेत्याने खरं सांगितलचं, म्हणाला-"काही कारणास्तव…"

shala movie fame actor anshuman joshi reveals why he is not doing marathi films says | अंशुमन जोशी 'शाळा' सिनेमानंतर मराठीमध्ये का दिसला नाही? 'त्या' प्रश्नावर अभिनेता म्हणाला-"आता माझं प्राधान्य..." 

अंशुमन जोशी 'शाळा' सिनेमानंतर मराठीमध्ये का दिसला नाही? 'त्या' प्रश्नावर अभिनेता म्हणाला-"आता माझं प्राधान्य..." 

Anushuman Joshi: सुजय डहाके दिग्दर्शित शाळा हा सिनेमा २०१२ साली प्रदर्शित झाला होता.  मिलिंद बोकील लिखित 'शाळा' या गाजलेल्या कादंबरीवर या सिनेमा आधारित होता. सिनेमातील मुकुंद या मुलाने शाळेतलं अवघं विश्वच आपल्या समोर उभं केलं. शाळा सिनेमात त्याने साकारलेलं अल्लड वयातलं प्रेम आजही त्याच्या अभिनय क्षमतेची आठवण करून देतं.या चित्रपटात बालकलाकार अंशुमन जोशी व केतकी माटेगावकर यांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती. या चित्रपटानंतर केतकी बऱ्याच सिनेमात झळकली. मात्र अंशुमन जोशी फारसा सिनेसृष्टीत काम करताना दिसला नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतीच गुढीपाडव्याच्या निमित्ताने अंशुमन जोशीने त्याची पत्नी, अभिनेत्री अपूर्वा गोरेसह लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. दरम्यान, त्याला शाळा सिनेमानंतर तू मराठी सिनेमात फारसा दिसला नाहीस तसं एखादं काम तुझ्याकडे आलं नाही का? किंवा तू त्या पद्धतीच्या कामाच्या शोधात होतास? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत अभिनेता म्हणाला,"शाळा सिनेमा केला तेव्हा मी दहावीत होतो. मी फक्त १४ वर्षांचा होतो. आमच्या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं ते ३० सप्टेंबर २०१० ला आणि ३१ ऑक्टोबर २०१० ला संपलं. शिवाय हा सिनेमा २ वर्षांनी रिलीज झाला. जसा मी सिनेमामध्ये दिसलो आहे तसा मी सिनेमा रिलीज झाल्यानंतर दिसतच नव्हतो.  पण, जेव्हा सिनेमा हिट झाला तेव्हा असं झालं की लोक बोलायचे अरे त्या मुलाला बोलवा. मी शेजारी उभा असूनही लोकांना कळलंच नाही की हा तोच आहे."

यापुढे अंशुमन मुलाखतीत म्हणाला," त्याच्यानंतर मी १८ चित्रपटांमध्ये मी काम केलं. पण, काही कारणास्तव ते सिनेमे आले नाहीत. मग मला असं लक्षात आलं,हे फार परस्परांवलंबी आहे. आपण अजून काहीतरी वेगळं करून पाहिलं पाहिजे. म्हणून मी नाटकात खूप काम केलं. नाटकात काम करत असताना मला जाणवलं की माझा पिंड हा सिनेमाच आहे. शिवाय मला स्वत:ची गोष्ट सांगायला आवडते.मला फक्त लिहियला आवडत नाहीतर मला दिग्दर्शनही करायला आवडतं. हे सगळं मी करून बघितलं. यादरम्यान, मी १६ सिनेमे केले."

अभिनय करायचा नाही असा काही भाग नाही, पण...

"या प्रत्येक सिनेमात मी वेगळा दिसतो. तुम्ही जर मला त्यांमध्ये पाहिलं तर ओळखूच शकणार नाही. असा प्रत्येक सिनेमा मी-मी वाटत नाही. मी प्रत्येक ठिकाणी वेगळा वाटतो. तेव्हाही मी काम केलं आणि आताही करतोय.मला कायम माझी गोष्ट सांगायला आवडते. अभिनय करायचा नाही असा काही भाग नाही.  पण,आता माझं प्राधान्य स्वत: चा सिनेमा करण्याचं आहे."

दरम्यान, सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. दमदार अभिनयासाठी अंशुमनलाही पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
शाळा चित्रपटानंतर अंशुमनने काही चित्रपटांत काम केले आहे. 'म्हैस'(२०१२), 'फुंतरू'(२०१६), 'फास्टर फेणे'(२०१७) यासारख्या मोजक्या मराठी चित्रपटांमध्ये तो झळकला. मात्र, त्यानंतर तो इंडस्ट्रीत फारसा दिसला नाही.

Web Title : अंशुमन जोशी: 'शाला' के बाद मराठी सिनेमा से क्यों गायब हो गए?

Web Summary : 'शाला' की सफलता के बाद अंशुमन जोशी ने मराठी सिनेमा से अपनी अनुपस्थिति बताई। उन्होंने थिएटर, फिल्म निर्माण किया और अपनी फिल्में बनाने पर ध्यान केंद्रित किया। उन्होंने 18 फिल्मों में अभिनय किया, लेकिन वे कभी रिलीज नहीं हुईं।

Web Title : Anshuman Joshi: Why he disappeared from Marathi cinema after 'Shala'.

Web Summary : Anshuman Joshi explains his absence from Marathi cinema after the success of 'Shala'. He pursued theatre, filmmaking and focused on creating his own films. He acted in 18 films, but they were never released.