रक्तबंबाळ चेहरा अन् खुंखार अवतार, 'ओ रोमिओ' सिनेमातील शाहिद कपूरचा फर्स्ट लूक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:02 IST2026-01-09T15:01:48+5:302026-01-09T15:02:15+5:30
शाहिद कपूरच्या या नव्या सिनेमाचं नाव 'ओ रोमिओ' असं असून सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये शाहिद कपूरचा खुंखार लूक पाहायला मिळत आहे.

रक्तबंबाळ चेहरा अन् खुंखार अवतार, 'ओ रोमिओ' सिनेमातील शाहिद कपूरचा फर्स्ट लूक समोर
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहिद लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक सरप्राइज दिलं आहे. शाहिद कपूरच्या या नव्या सिनेमाचं नाव 'ओ रोमिओ' असं असून सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये शाहिद कपूरचा खुंखार लूक पाहायला मिळत आहे.
शाहिदने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन 'ओ रोमिओ' सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. पोस्टरमध्ये शाहिदचा चेहरा रक्ताने माखलेला दिसत आहे. या पोस्टरमध्ये तो ओरडताना दिसत आहे. 'ओ रोमिओ' सिनेमातील शाहिदचा हा खुंखार लूक पाहून चाहत्यांच्या सिनेमाबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या सिनेमाची उत्सुकता लागल्याचं अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.
साजिद नाडियावालाची निर्मिती असलेला 'ओ रोमिओ' सिनेमाचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केलं आहे. सिनेमात शाहिद कपूरसोबत तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, तमन्ना भाटिया, विक्रांत मेस्सी, दिशा पटानी, अविनाश तिवारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर १३ फेब्रुवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.