Sara Tendulkar: सारा तेंडुलकरची बालीमध्ये धमाल मजा-मस्ती, मित्रांसोबत केली 'क्लब पार्टी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 21:07 IST2022-09-13T21:06:42+5:302022-09-13T21:07:48+5:30

साराने जंगल सफारीचाही आनंद लुटला

Sara Tendulkar photos viral night club party in Bali also enjoys jungle safari | Sara Tendulkar: सारा तेंडुलकरची बालीमध्ये धमाल मजा-मस्ती, मित्रांसोबत केली 'क्लब पार्टी'

Sara Tendulkar: सारा तेंडुलकरची बालीमध्ये धमाल मजा-मस्ती, मित्रांसोबत केली 'क्लब पार्टी'

Sara Tendulkar: भारताचा (Team India) माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर ही गेल्या काही महिन्यांमध्ये 'सोशल मीडिया क्वीन' म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. साराचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर झटपट ट्रेंड करताना दिसतात. आजकाल सारा तेंडुलकर बाली, इंडोनेशियामध्ये आहे. तिथे ती तिच्या मित्रांसोबत धमाल, मजा-मस्ती करताना दिसली. सारा तेंडुलकर तिच्या मैत्रिणींसोबत हँग आउट करण्यासाठी बालीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर क्लबमध्ये पार्टी करतानाचे फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले आहेत.

या सोबतच त्यांनी जंगल सफारीचा आनंदही घेतला आहे. साराने जिप्सीवर फिरतानाचा एक झक्कास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती निळ्याशार आकाशाखाली सुट्टीचा स्वैरपणे आनंद घेताना दिसत आहे.

सारा तेंडुलकर सतत तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. साराने अलीकडे अनेक फोटोशूट आणि अॅडशूट देखील केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकरने तिच्या हाताला मेहंदी लावतानाचे फोटो शेअर केले होते, त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू केली होती. मात्र, त्यानंतर सारा तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती हे समजलं. आता पुन्हा एकदा ती तिच्या मित्राच्या लग्नाआधी इंडोनेशियाला गेली आहे.

सारा तेंडुलकरच्या इंस्टाग्रामवर तिचे २ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सारा कायमच आपल्या फोटोंमुळे साऱ्यांची मनं जिंकत असते. तिचे काही फोटो व्हायरलही होताना दिसतात. दरम्यान, सारा बालीमध्ये असताना तिचे वडील सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी मालिकेत खेळत आहे.

Web Title: Sara Tendulkar photos viral night club party in Bali also enjoys jungle safari