आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:04 IST2025-06-23T14:04:21+5:302025-06-23T14:04:40+5:30

Mandira Kapoor Emotional Post: संजय कपूर यांच्या अचानक झालेल्या निधनाने कपूर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची बहीण मंधीरा कपूरने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

sanjuy kapur death sister Mandhira Kapur shared emotional post after karishma kapoor ex husband death | आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."

आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती आणि बिजनेसमॅन संजय कपूर यांचं १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते. लंडनमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संजय कपूर यांच्या अचानक झालेल्या निधनाने कपूर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची बहीण मंधीरा कपूरने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

मंधीराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. गेल्या ४ वर्षांपासून संजय कपूर आणि मंधीरा एकमेकांशी बोलत नसल्याचा खुलासा तिने पोस्टमधून करत त्याचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलं आहे. "मी आणि माझा भाऊ गेल्या ४ वर्षांपासून बोलत नव्हतो. भावंडांमध्ये झालेलं एक छोटं भांडण आमचे अहंकार आणि मुर्खपणामुळे एका वेगळ्या पातळीवर गेलं. आणि आम्ही पहिल्यासारखे परत कधीच झालो नाही. खूप सुंदर काळ आम्ही अनुभवला. दोन चांगल्या पालकांमुळे आमचं बालपण आनंदात गेलं. एकमेकांचे सीक्रेट, रात्री उशीरापर्यंत जागणं आणि त्यानंतर घराबाहेर पडणं, आमच्या तिघांचे फालतू जोक्स, आणि हसणं, हे सगळं करताना बाकीचे लोक आपल्याकडे गोंधळाने पाहत होते", असं ती पोस्टमध्ये म्हणते. 


पुढे तिने म्हटलंय की, "त्याने माझी आणि माझ्या बहिणीची काळजी घेतली. तो एक खरा मोठा भाऊ आणि चांगला मित्र होता. जे काही घडलं ते भयानक आणि निरर्थक होतं. त्याच्यासोबतचे क्षण पुन्हा अनुभवता येणार नाहीत. आम्ही पुन्हा कधीच एकत्र येऊ शकत नाही. आणि दुर्देवाने आपल्यातलं भांडणं आपण सोडवू शकलो नाही. असं असलं तरी मी त्याच्यावर प्रेम करते हे त्याला नक्कीच माहीत असेल. आणि एक दिवस हे भांडण मिटवून आम्ही ४७ वर्षांपहिल्यासारखे एकत्र येऊ ही देखील आशा त्याला असेल. माझ्या भावाची खूप आठवण येईल. आता मी त्याला या आयुष्यात पुन्हा कधीच पाहू शकणार नाही, हे कठोर सत्य आहे. पण, आता तो माझ्या वडिलांसोबत असेल आणि एक दिवस पुन्हा आम्ही सगळे एकत्र असू". 

"तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्तीशी, मग ती कुटुंबातील असो किंवा मित्र परिवारातील बोलत नसाल, तर माझ्या अनुभवातून शिका. आयुष्य हे फार तकलादू आहे. प्रत्येक दिवस हे एक गिफ्ट आहे. एकही दिवस किंवा तास वाया घालवू नका. ती पोकळी भरुन काढण्याची संधी तुम्हाला मिळेल की नाही याची खात्री नाही. आणि मग शेवटी पश्चाताप करण्यापलिकडे काही उरत नाही. माझ्या भावाला शेवटचं बघण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मला त्याला सांगायचं आहे की मी त्याच्यावर किती प्रेम करते", असं संजय कपूर यांच्या बहिणीने लिहिलं आहे.  

Web Title: sanjuy kapur death sister Mandhira Kapur shared emotional post after karishma kapoor ex husband death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.