अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी

लीड्स कसोटी सामन्यातील पहिल्या डावातही सोडली होती खास छाप, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:06 IST2025-06-23T17:06:08+5:302025-06-23T17:06:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ENG vs IND 1st Test KL Rahul Gets To Fifty After First Innings Disappointment Reaches Milestone After 7 Innings See Record | अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी

अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी

ENG vs IND 1st Test KL Rahul Gets To Fifty : भारताचा स्टायलिस्ट क्रिकेटर लोकेश राहुलनं दुसऱ्या डावात संयमी खेळीसह आपल्यातील क्लास दाखवत अर्धशतकाला गवसणी घातली आहे. लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. पण ४२ धावांवर तो तंबूत परतला होता. दुसऱ्या डावात मात्र त्याने अर्धशतकाचा डाव साधत कसोटी कारकिर्दीतील १८ ने अर्धशतक झळकावले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आठ वर्षांनी लोकेश राहुलनं साधला हा डाव

लीड्सच्या मैदानातील अर्धशतकी खेळीसह आठ वर्षांत पहिल्यांदाच केएल राहुलच्या भात्यातून कसोटी सामन्यात दोन्ही डावात ४० पेक्षा अधिक धावा आल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात त्याने ७८ चेंडूत ४२ धावांची उपयुक्त खेळी केली होती.   याआधी  २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानातील कसोटी सामन्यात त्याने ९० आणि ५१ धावांची खेळी केली होती.  

कसोटीत ९९ धावांवर विकेट्स गमावणारे फलंदाज, ब्रूकसोबत या यादीत पंत अन् MS धोनीचंही नाव

लीड्स कसोटी सामन्यातील पहिल्या डावातही सोडली होती खास छाप

इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर लोकेश राहुलवर फलंदाजीत सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अपेक्षेप्रमाणे लोकेश राहुलनं यशस्वी जैस्वालच्या साथीनं टीम इंडियाच्या डावाला सुरुवात केली. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने यशस्वीसोबत ९२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दुसऱ्या डावात त्याने पहिल्या चुका सुधारून अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या डावात लोकेश राहुलनं पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या साई सुदर्शनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. 

अर्धशतकाचं शतकात रुपांत करण्यात यशस्वी ठरणार का?

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटची कसोटी मालिका खेळली होती. या कसोटी मालिकेतील पाच सामन्यात दोन अर्धशतकासह (८४ आणि ७७ धावा) केएल राहुलनं २३१ धावा केल्या होत्या. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत डावाची सुरुवात करताना यापेक्षा सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडून आहे. केएल राहुलनं २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरीयन कसोटी सामन्यात १०१ धावांच्या खेळीसर कसोटीतील आठवे आणि शेवटचे शतक झळकावले होते. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या डावात तो नवव्या शतकाचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

केएल राहुलची कसोटीतील कामगिरी

२०१४ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या KL राहुलनं आतापर्यंतच्या कारकिर्दीत ५९ कसोटी सामन्यातील १०३ डावात ३३५३ धावा केल्या आहेत. १९९ ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. लोकेश राहुलनं सलामीसह मध्यफळीतील फलंदाजीशिवाय वेळप्रसंगी विकेटमागची जबाबदारीही बजावली आहे. 
 

Web Title: ENG vs IND 1st Test KL Rahul Gets To Fifty After First Innings Disappointment Reaches Milestone After 7 Innings See Record