'संजू'च्या नव्या ट्रेलरमधून धक्कादायक खुलासे; बघा जेलमध्ये काय झालं होतं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:09 IST2018-05-30T15:59:09+5:302018-05-30T16:09:56+5:30
संजय दत्तच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा प्रत्येक संवाद प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.

'संजू'च्या नव्या ट्रेलरमधून धक्कादायक खुलासे; बघा जेलमध्ये काय झालं होतं!
मुंबई: अभिनेता रणबीर कपूरच्या बहुचर्चित 'संजू' या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. पहिल्या ट्रेलरप्रमाणेच यामध्येही संजय दत्तच्या आयुष्यातील घटनांची ओझरती झलक पाहायला मिळत आहे. संजय दत्तच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा प्रत्येक संवाद प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.
'गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन। आज मेरे लिए बड़ा खुशी का दिन है। क्योंकि मेरी ऑटोबायोग्राफी मेरी आत्मकथा लोगों के सामने आ रही है।', या संवादाने या ट्रेलरची सुरूवात होते. त्यानंतर ट्रेलरमध्ये संजय दत्तच्या आयुष्यातील कल्पनाही केले नसतील, असे क्षण पडद्यावर पाहायला मिळतात. सामान्य प्रेक्षकांसाठी यापैकी काही गोष्टी धक्कादायक अशाच आहेत. त्यामुळे 29 जूनला मोठ्या पडद्यावर नवा संजय दत्त पाहायला मिळणार, यामध्ये कोणतीच शंका नाही. मात्र, त्यापूर्वी या चित्रपटातील संवाद लोकप्रिय झाले आहेत.
या ट्रेलरमधील काही रंजक संवाद खालीलप्रमाणे
मैं बेवड़ा हूं, ठरकी हूं, ड्रग एडिक्ट हूं लेकिन टेररिस्ट नहीं हूं।
मैंने पहली बार ड्रग्स ली क्योंकि मैं डैड से नाराज था। दूसरी बार क्योंकि मां बीमार थी। और तीसरी बार तक मैं ड्रग ए़डिक्ट हो चुका है।
अगर प्रोस्टीट्यूट को अलग रखूं तो अपनी लाइफ में अब तक 308 औरतों के साथ सो चुका हूं।
ट्रेलरमधील एका दृश्यात संजय दत्तने ड्रग्ज खरेदी करण्यासाठी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र विकल्याचे दिसत आहे.
ट्रेलरमधील आणखी एका दृश्यात जेलमध्ये संजय दत्तचे कपडे उतरवून पोलीस त्याला मारताना दिसत आहेत. याशिवाय, त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीत शौचालयाचे पाणी शिरल्याचेही आणखी एका दृश्यात दिसत आहे. प्रेक्षकांसाठी या गोष्टी नक्कीच धक्कादायक आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.