...तर 25 वर्षांनी एकत्र बघायला मिळतील संजय दत्त आणि माधुरी दीक्षित!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 02:57 PM2018-03-28T14:57:26+5:302018-03-28T14:59:26+5:30

माधुरी दीक्षित आणि संजय दत्त या दोघांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती.

Sanjay Dutt and Madhuri Dixit will be seen together after 25 years! | ...तर 25 वर्षांनी एकत्र बघायला मिळतील संजय दत्त आणि माधुरी दीक्षित!

...तर 25 वर्षांनी एकत्र बघायला मिळतील संजय दत्त आणि माधुरी दीक्षित!

googlenewsNext

मुंबई : श्रीदेवीच्या निधनानंतर तिने साईंन केलेल्या सिनेमांची कामे बंद पडली आहेत. यात एक करण जोहरचा देखील सिनेमा होता. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, करण जोहरच्या एका सिनेमात माधुरी दीक्षित काम करणार आणि या प्रोजेक्टमध्ये संजय दत्त सुध्दा दिसणार अशीही चर्चा रंगली होती. 

माधुरी दीक्षित आणि संजय दत्त या दोघांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. दोघांनी अनेक हिट सिनेमेही दिलेत. मीडिया रिपोर्टनुसार, दोघे ऐकमेकांच्या इतके प्रेमात होते की, त्यांनी लग्नाचाही प्लॅन केला होता. पण संजय दत्त याचं गुन्हेगारी कनेक्शन उघड झाल्याने माधुरी त्याच्यापासून दूर गेली. पुढे माधुरीने लग्न केलं. 

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, करण जोहरच्या आगामी सिनेमात माधुरी दीक्षित  दिसणार, यात आधी श्रीदेवी काम करणार होती. पण याबाबत अजूनही काही ऑफिशिअल माहिती नाहीये. सगळंकाही ठिक राहिलं तर या सिनेमात माधुरीच्या अपोझिट संजय दत्त स्क्रीन शेअर करताना दिसू शकतो. असे झाल्यास दोघेही तब्बल 25 वर्षांनी एकञ पडद्यावर बघायला मिळतील. खलनायक या सिनेमात दोघे शेवटचे एकत्र बघायला मिळाले होते.

Web Title: Sanjay Dutt and Madhuri Dixit will be seen together after 25 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.