सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:20 IST2025-04-17T16:20:12+5:302025-04-17T16:20:37+5:30
Salman Khan: सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकू शकला नाही.

सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
या वर्षी बऱ्याच लोकप्रिय कलाकारांचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले, त्यापैकी काहींनी चांगली कामगिरी केली तर काही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. यात सलमान खान(Salman Khan)चा 'सिकंदर' (Sikandar Movie) हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकू शकला नाही. त्याच वेळी, बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar), स्काय फोर्स नंतर केसरी २ (Kesari 2 Movie) घेऊन थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान त्याने सलमान खानच्या सिकंदर चित्रपट फ्लॉप ठरला, त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय कुमार नुकताच दिल्लीत 'केसरी चॅप्टर २' या आगामी चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला उपस्थित होता. सिनेमा मॉलमधून बाहेर पडताना हिंदुस्तान टाईम्सच्या एका पत्रकाराने अक्षय कुमारला सलमान खान आणि त्याच्या अलिकडच्या बॉक्स ऑफिसवरील फ्लॉप चित्रपट 'सिकंदर'बद्दल विचारले. यावर अक्षयने त्याच्या 'मुझसे शादी करोगी' चित्रपटातील सहकलाकाराला पाठिंबा दिला आणि म्हणाला, "टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा. सलमान हा अशा वाघाची एक जात आहे जी कधीच मरत नाही. तो माझा मित्र आहे आणि नेहमीच राहील." दरम्यान अक्षय कुमारचे सलमानसाठीचे हे शब्द काही क्षणातच व्हायरल झाले आणि भाईजानचे चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
'सिकंदर'च्या अपयशानंतर सलमान खान म्हणाला...
'सिकंदर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी सलमानने त्याच्या कठीण वर्कआउट सेशनचे दोन फोटो शेअर केले. सलमानने सिकंदरच्या नशिबाचा स्वीकार केला आणि त्याला प्रेरणा दिल्याबद्दल त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "प्रेरणेबद्दल धन्यवाद."
'सिकंदर'बद्दल
सलमान खानचा शेवटचा चित्रपट 'सिकंदर' ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आणि बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कमाल दाखवू शकला नाही. ईदला प्रदर्शित होऊनही सिकंदरने १७ दिवसांत जगभरात फक्त १८३ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे.