सलमान खानचं कौतुकास्पद काम, नाशिकच्या मालेगावमध्ये हृदयरोग शिबिराचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:24 IST2025-03-25T18:24:41+5:302025-03-25T18:24:53+5:30

सलमान खान त्याच्या फाऊंडेशनद्वारे मोठे सामाजिक काम गाजावाजा न करता करतो.

Salman Khans Being Human Foundation Organizes Health Camp For 200 Needy Children In Malegaon | सलमान खानचं कौतुकास्पद काम, नाशिकच्या मालेगावमध्ये हृदयरोग शिबिराचं आयोजन

सलमान खानचं कौतुकास्पद काम, नाशिकच्या मालेगावमध्ये हृदयरोग शिबिराचं आयोजन

बॉलिवूडचा भाईजान असलेला लोकप्रिय अभिनेता सलमान खान (Salman Khan) बिइंग ह्युमन संस्था  (Being Human Foundation) या माध्यमातून नेहमीच मदत कार्य करत असतो. आताही 'बीइंग ह्युमन फाऊंडेशन'नं रविवारी (२३ मार्च २०२५) नाशिकमधील मालेगाव येथे हृदयरोग विषयक शिबिराचे आयोजन केलं होतं. हे शिबीर २०० हून अधिक मुलांकरता जीवन संजीवनी ठरलं. अभिनेत्याचं हे काम पाहून चाहते सलमानवर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. चाहत्यांकडून सलमानवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

बिइंग ह्युमन संस्थेकडून आयोजित केलेल्या या शिबिरात आरोग्यविषयक संभाव्य समस्या ओळखण्याकरता मोफत हृदय तपासणी तसेच आणि इको चाचणी करण्यात आली. जेणेकरून हृदयविकार आढळून आल्यास त्यावर त्वरित उपचार करता येईल. सलमानने केलेल्या या मदतीने सर्वांचे मन जिंकले आहे. सलमान त्याला जमेल तितकी आणि जमेल तितक्या लवकर गरजुंपर्यंत मदत पोहचवत असतो.

'बीइंग ह्युमन फाऊंडेशन'तर्फे गावा- खेड्यातील लोकांना आणि गरजूंना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. पडद्यावर ‘लार्जर दॅन लाइफ’ व्यक्तिरेखेकरता ओळखला जाणारा सलमान खान त्याच्या फाऊंडेशनद्वारे मोठे सामाजिक काम गाजावाजा न करता करतो. प्रामुख्याने आरोग्य सेवा, शिक्षण आणि बालकल्याण या क्षेत्रांत सलमानने अत्यंत प्रभावी काम केले आहे. एका सामान्य कुटुंबाच्या आयुष्यात अर्थपूर्ण बदल घडवण्यात सलमानचं मोठं योगदान आहे. सलमानची 'बीइंग ह्युमन फाऊंडेशन' ही सलमान खानने स्थापन केलेली एक ना-नफा तत्त्वावर काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. ज्या संस्थेद्वारे वंचितांना आरोग्य सेवा आणि शिक्षण विषयक सुविधा पुरवल्या जातात.

Web Title: Salman Khans Being Human Foundation Organizes Health Camp For 200 Needy Children In Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.