आलिया भटनंतर आता 'साथ निभाना साथिया'फेम राशीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 15:49 IST2022-11-08T15:24:21+5:302022-11-08T15:49:38+5:30
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट नंतर आता टीव्ही अभिनेत्री रुचा हसबनीसच्या घरीही नव्या पाहुण्याचं आगमन झालं. अभिनेत्रीनं शेअर केला बाळाचा पहिला फोटो.

आलिया भटनंतर आता 'साथ निभाना साथिया'फेम राशीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन
Rucha Hasabnis Welcomes Baby Boy:बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) नंतर आता टीव्ही अभिनेत्री रुचा हसबनीस(Rucha Hasabnis) च्या घरीही नव्या पाहुण्याचं आगमन झालं. अभिनेत्री रुचा हसबनीस 'साथ निभाना साथिया' मालिकेतील राशी बेन'च्या भूमिकेमुळे घराघरो पोहोचली. रुचा दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोशल मीडिय अकाऊंटवरुन तिनं ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.रुचानं आपल्या बाळाची पहिली झलक ही दाखवली आहे.
'साथ निभाना साथिया' फेम रुचा हसबनीसने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. आपल्या मुलाचा पहिला फोटो शेअर करत 'तू जादू आहेस' असं कॅप्शन दिलं आहे.
रुचा हसबनीस अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे आणि तिने 2010 ते 2014 च्या 'साथ निभाना साथिया' मालिकेमध्ये खूप गाजली. यानंतर तिने डेली सोपमधून ब्रेक घेतला आणि 2015 मध्ये बिझनेसमन राहुल जगदाळेसोबत लग्न केले. 2019 मध्ये तिने मुलगी रुहीला जन्म दिला. आता डेली सोपमध्ये काम करणे तिच्यासाठी खूप कठीण जाणार आहे, असे रुचाला वाटते. कदाचित याच कारणामुळे त्याने अद्याप टीव्हीवर पुनरागमन केले नाही.