Rohit Shetty : घरावर झालेल्या गोळीबारानंतर रोहित शेट्टीने सर्व प्लॅन्स केले रद्द; जवळच्या मित्रांना केली 'ही' विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:55 IST2026-02-01T18:54:13+5:302026-02-01T18:55:58+5:30

Rohit Shetty : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर काल रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

Rohit Shetty cancels all plans after firing outside home | Rohit Shetty : घरावर झालेल्या गोळीबारानंतर रोहित शेट्टीने सर्व प्लॅन्स केले रद्द; जवळच्या मित्रांना केली 'ही' विनंती

Rohit Shetty : घरावर झालेल्या गोळीबारानंतर रोहित शेट्टीने सर्व प्लॅन्स केले रद्द; जवळच्या मित्रांना केली 'ही' विनंती

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर काल रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. जुहू येथील त्याच्या इमारतीबाहेर एका व्यक्तीने चार-पाच राऊंड फायर केले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. ही घटना घडली तेव्हा रोहित शेट्टी स्वतः घरातच होता. दिग्दर्शकाच्या घराबाहेरील या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे.

रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. चाहते दिग्दर्शक आणि त्याच्या कुटुंबासाठी चिंतेत आहेत. रोहित शेट्टी आपल्या घरी पत्नी आणि आईसोबत राहतो. घरावर गोळ्या झाडल्यानंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितने पुढील दोन दिवसांचे आपले सर्व प्लॅन्स रद्द केले आहेत. त्याने आपला जवळचा मित्र आणि अभिनेता अजय देवगण यालाही किमान पुढचे ४८ तास घरी न येण्याची विनंती केली आहे.

सूत्रांनी सांगितले की, 'रोहित सध्या मुंबई पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असून आपला जबाब नोंदवत आहे. तो तपासात पूर्णपणे सहभागी होत आहे. घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, परंतु त्याने चित्रपटसृष्टीतील सर्व मित्रांना घरी न येण्यास सांगितलं आहे. तो आपल्या काळजीत असलेल्या मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी फक्त फोन आणि मेसेजद्वारे संवाद साधत आहे.'

 मध्यरात्री थरार! गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबाबत मिळाली मोठी माहिती

रोहित शेट्टींच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी शुभम लोणकर, आरजू बिश्नोई आणि हरी बॉक्सर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे घेतली आहे, जे लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य आहेत. शुभम लोणकर हा तोच गँगस्टर आहे, जो बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात वॉन्टेड आहे. शुभम लोणकरने रोहित शेट्टींना धमकी देताना लिहिलं की, "जर रोहितने त्यांच्या कामात ढवळाढवळ करणं बंद केलं नाही, तर ते त्याला जीवे मारतील. ज्या गोळ्या आता घराबाहेर झाडल्या आहेत, त्या नंतर त्यांच्या बेडरूममध्ये घुसून छातीवर झाडू."

रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक असून त्याची अजय देवगण, अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांशी चांगली मैत्री आहे. आता त्याच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. कारण अशा प्रकारे गोळीबाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यापूर्वी सलमान खान, एल्विश यादव आणि दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेरही गोळीबार झाला होता. तसेच कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवरही गोळीबार करण्यात आला होता.
 

Web Title : गोलीबारी के बाद रोहित शेट्टी ने योजनाएँ रद्द कीं; दोस्तों से दूर रहने का अनुरोध।

Web Summary : बिश्नोई गिरोह द्वारा रोहित शेट्टी के घर पर गोलीबारी के बाद, उन्होंने योजनाएँ रद्द कर दीं और अजय देवगन सहित दोस्तों को दूर रहने के लिए कहा। शेट्टी पुलिस के साथ सहयोग कर रहे हैं, और धमकियों के बाद सुरक्षा बढ़ा दी गई है।

Web Title : Rohit Shetty cancels plans after firing; requests friends to stay away.

Web Summary : After a shooting at Rohit Shetty's home claimed by the Bishnoi gang, he canceled plans and asked friends, including Ajay Devgn, to stay away. Shetty is cooperating with police, and security has been increased following threats.