Secret Superstar Movie Review:सुपरस्टार जायरा वसीमचा थक्क करणारा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST2017-10-21T06:08:54+5:302023-08-08T19:16:16+5:30
इंसियाचे स्वप्न असते गायिका होण्याचे.इंसियाची आई लेकीचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपला हार विकते आणि इंसियाला एक लॅपटॉप विकत घेऊन देते. इंसिया या लॅपटॉपच्या मदतीने युट्यूबवर आपले एक चॅनल सुरु करते. या युट्यूबवर आपली गाणी अपलोड करते.
.jpg)
Secret Superstar Movie Review:सुपरस्टार जायरा वसीमचा थक्क करणारा प्रवास
इंसियाचा आवाज ऐकून तिला एका संगीतकाराचा फोन येतो. तो फोन असतो संगीतकार शक्ती कुमार याचा (आमीर खान) मात्र इंसिया याकडे फारसे लक्ष देते नाही. याचित्रपटातील आमीर खानचा लूक फारच हटके आहे. आमीरच्या फॅन्सना तो नक्कीच सरप्राईज करेल. यानंतर इंसियाच्या आयुष्यात एक वेगळेवळण येते. तिच्या वडिलांची सौदी अरेबियाला बदली होते. मात्र इंसियाला तिकडे जायचे नसते. तिच्या आईवर होणाऱ्या अत्याचारांपासून तिला बाहेर काढायचे असते. शक्तीने दिलेली ऑफर इंसिया स्वीकारते आणि ते गाणं सुपरहिट होते.यानंतर इंसिया आपले गायिका होण्याचे स्वप्न पूर्ण करु शकते का ?, आपल्या आईला न्याय मिळवून देऊ शकते का? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
जायराने इंसियाचे पात्र अतिशय सशक्तपणे पडद्यावर साकारले आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून अव्दैत चंदनने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. इंसिया वडिलांची भूमिका राज अर्जुनने अत्यंत चोखपणे साकारली आहे. मात्र चित्रपटच्या संगीतबदल बोलायचे झाले तर ते मनाला फारसे भावत नाही. इंसियाचा गायिका बनण्याचा संघर्षमय प्रवास बघण्यासाठी नक्कीच एकदा हा चित्रपट पाहा.