Gadar 2 Review:अ‍ॅक्शन आहे, ड्रामा आहे, पण...; तारासिंगच्या पुत्रप्रेमाची अन् देशप्रेमाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:32 PM2023-08-11T12:32:34+5:302023-08-11T13:49:13+5:30

Gadar 2 Review: नेमकं काय आहे 'गदर 2' चं कथानक?

gadar-2 movie review-sunny-deol-and-ameesha-patel-film | Gadar 2 Review:अ‍ॅक्शन आहे, ड्रामा आहे, पण...; तारासिंगच्या पुत्रप्रेमाची अन् देशप्रेमाची गोष्ट

Gadar 2 Review:अ‍ॅक्शन आहे, ड्रामा आहे, पण...; तारासिंगच्या पुत्रप्रेमाची अन् देशप्रेमाची गोष्ट

Release Date: November 08,2023Language: हिंदी
Cast: सनी देओल, अमिषा पटेल,मनीष वाधवा, सिमरत कौर
Producer: अनिल शर्मा, कमल मुकूटDirector: अनिल शर्मा
Duration: 2 तास 45 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

२२ वर्षांपूर्वी सनी देओल  (Sunny Deol)आणि अमिषा पटेल (ameesha patel) यांचा 'गदर: एक प्रेमकथा' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने त्याकाळी अक्षरश: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये राहणाऱ्या दोन प्रेमींची कथा, त्यांचं देशप्रेम अत्यंत सुंदररित्या उलगडण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हा सिनेमा गाजल्यानंतर त्याचा पुढचा भागसुद्धा रिलीज व्हावा अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती. त्यानंतर तब्बल २२ वर्षानंतर या सिनेमाचा सिक्वल प्रदर्शित झाला. नुकताच  'गदर 2'  (gadar 2) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' या सिनेमाची घोषणा केल्यापासून तो तुफान चर्चेत आला होता. पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर तारासिंग आणि सकिना यांची लव्हस्टोरी बहरली जाणार होती. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट  पाहत होते. अखेर ११ ऑगस्ट रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडकला. त्यामुळे हा सिनेमा नेमका कसा आहे, त्याचं कथानक कसं आहे आणि मुळात २२ वर्षानंतर सनी देओल आणि अमिषा पटेल यांची केमिस्ट्री कशी दिसतीये असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

काय आहे सिनेमाचं कथानक?

'गदर 2' या सिनेमाची कथादेखील तारासिंग आणि त्याचा मुलगा चरणजीत सिंह यांच्या नात्याभोवती फिरताना दिसते. 'गदर'मध्ये तारासिंग आणि सकिना यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. परंतु, यावेळी त्यांच्या मुलावर ही कथा एकप्रकारे बेतली आहे. गदरमध्ये त्यांचा चरणजीत सिंह हा लहान मुलगा आता मोठा झाला आहे.  विशेष म्हणजे चरणजीतदेखील तारासिंगप्रमाणेच देशभक्त आहे. परंतु, देशासेवा करत असताना तो पाकिस्तानच्या तावडीत सापडतो. त्यामुळे पाकिस्तानमध्ये त्याला बंदी केलं जातं. इतकंच नाही तर त्याच्यावर बरेच अत्याचार केले जाता. मात्र, देशसेवेने भारावलेला चरणजीत पाकिस्तानपुढे झुकायला तयार होत नाही. एकीकडे चरणजीतवर पाकिस्तानमध्ये अन्याय होत असतो. तर, दुसरीकडे तारासिंग आणि सकिना त्याची घरी परतण्याची वाट पाहात असतात.  विशेष म्हणजे अनेक हालचाली केल्यानंतरही चरणजीतला पुन्हा देशात आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरतात. म्हणून, तारासिंग स्वत:  आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतो. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे तारासिंग पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या मुलाला सोडवण्यासाठी लढतो. परंतु, त्याचं पुढे काय होतं. तारासिंग चरणजीतला सुखरुपपणे भारतात आणतो का? की चरणजीतप्रमाणेच तारासिंगलादेखील बंदी केलं जातं हे सिनेमा पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना कळणार आहे.

कलाकारांचा अभिनय

गदरमध्ये सनी देओलने साकारलेली तारासिंग ही भूमिका विशेष गाजली होती. परंतु, त्याच्या अभिनयाची जादू 'गदर 2' मध्ये फारशी दिसली नाही. फर्स्ट हाफमध्ये तारासिंग अत्यंत थकलेल्या अवस्थेत दिसून आला. तारासिंगच्या वाढत्या वयाची भूमिका  सनीने उत्तमरित्या साकारायचा प्रयत्न केला आहे. मात्र, तारासिंगला वयस्क दाखवण्याच्या नादात तो त्याच्या अभिनयातील एनर्जी दाखवण्यास कमी पडला. या सिनेमात त्याला पुन्हा एकदा दमदार संवाद मिळाले आहेत. तर, दुसरीकडे अमिषा पटेल हिला तिचा अभिनय दाखवायची पुरेशी संधी मिळाली नाही. अमिषाला सनी देओलच्या तुलनेत कमी स्क्रीन मिळाली आहे. परंतु, त्यातूनही तिने उत्तमरित्या सकिना साकारली.  सनी आणि अमिषा यांच्यासोबतच सिमरत कौर, मनीष वाधवा यांनीही उत्तमरित्या त्यांच्या भूमिका साकारल्या आहेत.

दिग्दर्शन -

शक्तिमान तलावर लिखित 'गदर 2' या सिनेमाची मूळ कथा तारासिंग आणि त्याच्या मुलाभोवती फिरते. सिनेमाच्या पहिल्या भागात कथा अत्यंत संथ गतीने पुढे सरकते. परंतु, दुसऱ्या भागात ही कथा स्पीडमध्ये पुढे गेली आहे. सिनेमाच्या कथानकाला पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे.

प्रेक्षकांची प्रतिक्रिया

'गदर 2' हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंगदेखील जोरदार झालं होतं. विशेष म्हणजे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे. अनेकांनी पैसा वसूल झाल्याचं म्हटलं आहे. अनेकांना या सिनेमाची कथा प्रचंड आवडली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या सिनेमाचा बोलबाला आहे. तर,दुसरीकडे काही प्रेक्षकवर्गाकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. पहिल्या 'गदर'ची सर 'गदर 2' ला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या सिनेमाला सध्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे.
 

Web Title: gadar-2 movie review-sunny-deol-and-ameesha-patel-film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.