रिमा लागू यांची लेक दिसायला आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर, अभिनयाऐवजी ती या क्षेत्रात आहे कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 01:22 PM2023-10-09T13:22:43+5:302023-10-09T13:23:14+5:30
Reema Lagoo : रिमा लागू यांना एकुलती एक मुलगी आहे. ती अभिनयाऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.
![Reema Lagoo's daughter looks as beautiful as the actress, instead of acting she is working in this field | रिमा लागू यांची लेक दिसायला आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर, अभिनयाऐवजी ती या क्षेत्रात आहे कार्यरत Reema Lagoo's daughter looks as beautiful as the actress, instead of acting she is working in this field | रिमा लागू यांची लेक दिसायला आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर, अभिनयाऐवजी ती या क्षेत्रात आहे कार्यरत](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/whatsapp-image-2023-10-09-at-1.15.14-pm-1_2023101100753.jpeg)
रिमा लागू यांची लेक दिसायला आहे अभिनेत्रीइतकीच सुंदर, अभिनयाऐवजी ती या क्षेत्रात आहे कार्यरत
मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo) यांनी विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. रिमा यांनी आपल्या सिने कारकीर्दीत एक नव्हे तर एकापेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी 'मैंने क्या किया', 'हम आपके है कौन', 'कल हो ना हो', 'साजन', 'पत्थर के फूल', 'हम साथ साथ हैं', 'दिलबर', 'येस बॉस', 'आरजू', 'किडनॅप' यांसारख्या अनेक हिट सिनेमात काम केले आहे. रिमा लागू यांना एकुलती एक मुलगी आहे. ती अभिनयाऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.
नाटक, चित्रपट प्रवास सुरु असतानाच विवेक लागू सोबत रिमा यांचे प्रेम जुळले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मृण्मयी लागू ही त्यांची एकुलती एक मुलगी. मृण्मयी लहान असताना रिमा लागू सतत शूटिंगमध्ये व्यस्त असत. मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी इतर कोणाला देण्यापेक्षा त्यांनी तिला होस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील असंख्य ठिकाणी फिरून त्यांनी हॉस्टेल शोधले, शेवटी पाचगणीमध्ये त्यांना पाहिजे तसे हॉस्टेल मिळाले. मृण्मयी जेव्हा दोन महिन्यांच्या सुट्टीवर घरी यायची तेव्हा रिमा लागू कुठल्याच ऑफर स्वीकारत नसत. याकाळात त्यांनी अनेक चांगल्या ऑफर्सना नाकारले होते.
घर, कुटुंब, सणवार साजरे करणे रिमा लागू यांना खूप आवडायचे. आपली मुलगी देखील याच क्षेत्रात यावी असा त्यांनी विचार केला. पण मृण्मयीने जेमतेमच प्रोजेक्ट्स केले. दोघात तिसरा आता सगळं विसरा, मुक्काम पोस्ट लंडन या मराठी चित्रपटानंतर मृण्मयी अभिनय क्षेत्रातून बाजूला झाली. अभिनय क्षेत्र आवडत नाही आणि आता यात काहीच करिअर करण्याची इच्छा नाही, असा निर्णय मृण्मयीने आई वडिलांना सांगितला. त्यांनीही तिच्या आवडत्या क्षेत्रात जाण्याची तिला परवानगी दिली.
लेखिका म्हणून आहे कार्यरत
गेली अनेक वर्षे मृण्मयी अभिनय क्षेत्र सोडून बॅक आर्टिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. असिस्टंट म्हणून तिने थ्री इडियट्स चित्रपटासाठी काम केले होते. आमिर खानच्या दंगल चित्रपटासाठी मृण्मयीने असिस्टंट म्हणून काम केले. पण आता ती वेबसिरीज आणि चित्रपटांसाठी लेखिका म्हणून काम करत आहे. थप्पड या तापसी पन्नूच्या चित्रपटासाठी तिने लेखिका म्हणून काम केले आहे.