इंटिमेट सीन करायला तयार, पण एका अटीवर...; अभिनेत्री शिवांगी जोशीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 12:12 IST2023-03-20T12:11:31+5:302023-03-20T12:12:13+5:30

अभिनेत्री शिवांगी जोशी अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. अगदी लहान वयात तिने अभिनयाला सुरुवात केली

Ready to do an intimate scene, but on one condition...; Disclosure of actress Shivangi Joshi | इंटिमेट सीन करायला तयार, पण एका अटीवर...; अभिनेत्री शिवांगी जोशीचा खुलासा

इंटिमेट सीन करायला तयार, पण एका अटीवर...; अभिनेत्री शिवांगी जोशीचा खुलासा

मुंबई - शिवांगी जोशी ही टिव्ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक चेहरा. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या माध्यमातून तिच्या अभिनयाची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. या मालिकेत तिने अनेक इंटिमेट सीन्सही दिले आहेत. शिवांगी इंटिमेट सीनसाठी कधीही तयार झाली नसती. याआधी तिने अशा सीन्ससाठी नकारही दिला होता. अलीकडेच या अभिनेत्रीने भविष्यात इंटिमेट सीन्स द्यायला तयार आहे की नाही याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

अभिनेत्री शिवांगी जोशीने तिच्या मुलाखतीत म्हटलंय की, मी भविष्यात इंटिमेट सीन्स करू शकते. परंतु त्यासाठी एक अट आहे. हा सीन्स त्या प्रोजेक्टवर आवश्यक आहे का त्यावर निर्भर आहे. जर खरेच जास्तच गरजेचे आहे तर मी कॅमेऱ्यासमोर कंफर्टेबल झाले तर करू शकते. एक अभिनेत्री म्हणून मला कंफर्ट झोनमधून बाहेर पडावे लागते. त्यासाठी मी हे करण्यास तयार आहे. परंतु त्याला एक मर्यादा आहे. जी मी ठरवून ठेवली आहे. मी सध्या तरी ती मर्यादा ओलंडण्यास तयार नाही असं तिने सांगितले. 

अनेक मालिकांमध्ये केलीय भूमिका
अभिनेत्री शिवांगी जोशी अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. अगदी लहान वयात तिने अभिनयाला सुरुवात केली. 'ये रिश्ता क्या कहलाता है' यातील नायरा या भूमिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली, त्यानंतर ती बालिका वधूमध्ये दिसली आणि सध्या अभिनेत्री शिवांगी जोशी बेकाबू मालिकेत काम करत आहे. या शोमध्ये ती परीच्या भूमिकेत दिसत आहे. तर, यापूर्वी अभिनेत्रीला किडनीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शिवांगी जोशीचा मोठा चाहता वर्ग आहे. चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात, परंतु नुकतेच अभिनेत्रीच्या तब्येतीबाबत चिंताजनक बातमी समोर आली होती. शिवांगीने सोशल मीडियावर तिच्या हेल्थसंदर्भात अपडेट शेअर केले होते ते वाचून चाहते हैराण झाले. तिला लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थना करत आहेत. शिवांगी जोशीच्या किडनीना इन्फेक्शन झालं आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केला त्या फोटोमध्ये शिवांगी हॉस्पिटलच्या बेडवर पडून हसताना दिसत आहे.

Web Title: Ready to do an intimate scene, but on one condition...; Disclosure of actress Shivangi Joshi