'तो काही माइंड-ब्लोइंग अभिनेता नाही'; 'मर्डर 2' फेम अभिनेत्याने रणवीरवर ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 01:05 PM2024-04-26T13:05:16+5:302024-04-26T13:05:45+5:30

Prashant narayanan: 'मर्डर 2' फेम अभिनेत्याने उडवली रणवीरची खिल्ली; 'पद्मावत' सिनेमाविषयी केलं मोठं विधान

ranveer-singh-is-not-a-mind-blowing-actor-lied-about-getting-into-a-dark-phase-for-padmaavat-says-this-actor | 'तो काही माइंड-ब्लोइंग अभिनेता नाही'; 'मर्डर 2' फेम अभिनेत्याने रणवीरवर ओढले ताशेरे

'तो काही माइंड-ब्लोइंग अभिनेता नाही'; 'मर्डर 2' फेम अभिनेत्याने रणवीरवर ओढले ताशेरे

अतरंगी फॅशन आणि अभिनयशैली यांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंह (ranveer singh). अल्पावधीमध्ये रणवीरने कलाविश्वात त्याची जागा निर्माण केली आहे. आज त्याचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजतो. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे पद्मावत. या सिनेमात रणवीरने अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारली होती. या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुकही झालं होतं. खिल्जीची भूमिका करत असताना त्याचा मानसिकदृष्ट्या खूप परिणाम झाला होता, असं रणवीरने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. मात्र, रणवीरचं हे विधान खोट असल्याचा दावा 'मर्डर 2' फेम अभिनेता प्रशांत नारायणन (prashant narayanan) याने केला आहे.
 

प्रशांतने अलिकडेच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने रणवीरच्या अभिनयाला खोटं म्हटलं आहे. तसंच त्याच्या डार्क परफॉर्मन्सच्या दाव्याची खिल्लीही उडवली आहे.

रणवीर काही माइंड-ब्लोइंग अभिनेता नाही

प्रशांतने अनेक सिनेमांमध्ये डार्क शेड भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे सिद्धार्थने त्याला रणवीरच्या जुन्या वक्तव्याविषयी एक प्रश्न विचारला. "रणवीरने अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारल्यानंतर त्याला खूप त्रास झाला होता.त्याच्या मनावर खूप परिणाम झाला होता ज्यामुळे त्याला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली होती, याविषयी तुला काय वाटतं?" असं प्रशांतला विचारण्यात आलं होतं.

 त्यावर, "तो खोटं बोलतोय. तो असा काही माइंड-ब्लोइंग अभिनेता नाही. त्याने अशी कोणती माइंड-ब्लोइंग भूमिका साकारली नव्हती ज्यामुळे त्याला हे सगळं करावं लागलं. भावा, तू तुझ्या सेटवर जा, तुझा चांगला मेकअप केला जाईल आणि तू फक्त मनापासून काम कर. सगळे अभिनेता या सगळ्या गोष्टी यासाठी करतात कारण त्यांना कोट्वधींचं मानधन मिळालं असतं. आणि, त्या मानधनाच्या मूल्याशी समाधान व्यक्त करायचं असतं. हे डार्क फेजमध्ये जाणं किंवा नकारात्मक होणं हे सगळं बकवास आहे. कुठे ना कुठे तुम्हाला स्वत:च्या मानधनाला न्याय द्यावाच लागेल ना. म्हणून मग ते असं वक्तव्य करतात," असं प्रशांत म्हणाला.

पुढे तो म्हणतो ," मला तर अशा अभिनेत्यांचं हसायला येतं जे स्वत:ला खूप गंभीर असल्यासारखं दाखवतात. अरे का सीरिअस होता? रुग्णालयात होतात का? मी कधीच माझ्या कोणत्याच भूमिकेविषयी असं काही बोललो नाही. हे कलाकार चेहऱ्यावर खूप गंभीर भाव दाखवतात आणि त्यांना विचारलं की म्हणतात, अरे मी ते डायलॉग्स म्हणत होतो. फक्त डायलॉग्सचा विषय असेल तर ते तरी नीट करा ना. चांगला दीर्घ श्वास घ्या "

दरम्यान, प्रशांतने अनेक सिनेमांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. 'मर्डर 2', 'रंगबाज', अभय’, ‘माई’ यांसारख्या वेब सीरिजमध्येही त्याने काम केलंय.

Web Title: ranveer-singh-is-not-a-mind-blowing-actor-lied-about-getting-into-a-dark-phase-for-padmaavat-says-this-actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.