राणी मुख्रर्जीला झाले कन्यारत्न

By Admin | Updated: December 9, 2015 15:53 IST2015-12-09T15:28:59+5:302015-12-09T15:53:43+5:30

बॉलिवुड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माता आदित्य चोप्रा आई-बाबा बनले आहेत.

Rani Mukherjee gets Kanye Ratna | राणी मुख्रर्जीला झाले कन्यारत्न

राणी मुख्रर्जीला झाले कन्यारत्न

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ९ - बॉलिवुड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माता आदित्य चोप्रा आई-बाबा बनले आहेत. राणीने बुधवारी सकाळी मुंबईच्या ब्रीच कँण्डी रुग्णालयात सुंदर कन्येला जन्म दिला. राणी आणि आदित्यने मुलीचे नामकरण आदिरा असे केले आहे. आदिरा या नावात आदित्य आणि राणी दोघांच्या नावाचा समावेश होतो. 

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात राणीने हितचिंतक, चाहत्यांचे आभार मानले आहेत. आदिराच्या रुपाने देवाने मला आज आयुष्यातील सर्वात सुंदर भेट दिली आहे. या प्रसंगी मी माझ्या चाहत्यांचे, मित्रांचे हितचिंतकांचे त्यांनी दिलेले प्रेम, आर्शिवादाबद्दल आभार मानते. 
आदिराच्या रुपाने आमच्या आयुष्यात नवा अध्याय सुरु होत आहे असे राणीने म्हटले आहे. बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रेटींनी सोशल मिडीयावरुन राणी-आदित्यला शुभेच्छा दिल्या आहेत. 
 

Web Title: Rani Mukherjee gets Kanye Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.