३ महिन्यात ९३ मुली गायब! 'कुसूमपूरच्या अम्मा'शी भिडणार राणी मुखर्जी, पाहा 'मर्दानी ३'चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:13 IST2026-01-12T17:09:14+5:302026-01-12T17:13:31+5:30

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करायला सज्ज झाली आहे.

Rani Mukerji Returns As Shivani Roy Mardaani 3 Trailer Out Movie Release Date January 30 | ३ महिन्यात ९३ मुली गायब! 'कुसूमपूरच्या अम्मा'शी भिडणार राणी मुखर्जी, पाहा 'मर्दानी ३'चा ट्रेलर

३ महिन्यात ९३ मुली गायब! 'कुसूमपूरच्या अम्मा'शी भिडणार राणी मुखर्जी, पाहा 'मर्दानी ३'चा ट्रेलर

राणी मुखर्जी ही एक फार लोकप्रिय आणि गाजलेली अभिनेत्री आहे. राणी तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेच, मात्र तिच्या अभिनयाची चर्चा कायमच असते.  'राजा की आयेगी बारात' चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या राणीनं सिनेसृष्टीत ३० वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रवासाचा आनंद वाढवत आज 'मर्दानी ३' चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. राणीला पुन्हा आयकॉनिक शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत पाहून चाहते आनंदी झाले आहेत.  हा ट्रेलर अंगावर काटा आणण्यासाठी पुरेसा आहे.

३ मिनिटे १६ सेकंदांच्या या थरारक ट्रेलरची सुरुवातच मुलींच्या अपहरणाने होते. त्यानंतर ही गुंतागुंतीची केस NIA ऑफिसर शिवानी शिवाजी रॉयकडे सोपवली जाते. जेव्हा शिवानीला समजतं की, गेल्या ३ महिन्यांत तब्बल ९३ मुली गायब झाल्या आहेत, तेव्हा ती या प्रकरणाचा मुळापासून छडा लावण्याचं ठरवते. तपासादरम्यान तिला एका आरोपीकडून 'कुसूमपूरची अम्मा' हिच्याबद्दल माहिती मिळते. ही अम्मा गरीब घरातील लहान मुलींचं अपहरण करून नक्की काय करते? याचा शोध सुरू होतो. या क्रूर रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी शिवानी मैदानात उतरते. विशेष म्हणजे, ट्रेलरमधील अम्मा आणि शिवानी रॉय यांच्यातील फोनवरचा संवाद अंगावर शहारे आणणारा आहे. 

'मर्दानी'मध्ये मानवी तस्करी आणि 'मर्दानी २' मध्ये सिरीयल रेपिस्टची मानसिकता दाखवल्यानंतर, 'मर्दानी ३' ची कथा देखील सत्य घटनांवर आधारित आहे. 'मर्दानी ३' मध्ये यावेळी राणीचा सामना एका महिलेशी आहे. मल्लिका प्रसाद या चित्रपटात 'अम्मा' नावाच्या क्रूर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. तसेच 'शैतान' फेम अभिनेत्री जानकी बोडीवाला ही देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केले असून, 'द रेल्वे मेन' फेम आयुष गुप्ता यांनी याचे लेखन केले आहे.

२०१४ मध्ये आलेल्या 'मर्दानी' चित्रपटात राणी मुखर्जीने पोलीस अधिकारी शिवानी रॉयची भूमिका साकारली होती आणि तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मर्दानीचा दुसरा भाग २०१९ मध्ये आला होता. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरले. आता 'मर्दानी ३'मधून बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकूळ घालण्यास राणी मुखर्जी सज्ज झाली आहे. राणी मुखर्जीचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट याच महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ३० जानेवारी रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title : रानी मुखर्जी 'मर्दानी 3' में बाल अपहरण से लड़ेंगी।

Web Summary : रानी मुखर्जी 'मर्दानी 3' में शिवानी शिवाजी रॉय के रूप में वापस, 'कुसुमपुर की अम्मा' के नेतृत्व में एक बाल अपहरण गिरोह से निपट रही हैं। तीन महीनों में तिरानवे लड़कियां गायब हो गई हैं। फिल्म 30 जनवरी को रिलीज होगी।

Web Title : Rani Mukerji returns in 'Mardaani 3' to fight child abduction.

Web Summary : Rani Mukerji is back as Shivani Shivaji Roy in 'Mardaani 3', tackling a child abduction ring led by 'Kusumpur's Amma'. Ninety-three girls have disappeared in three months. The film, inspired by true events, releases January 30.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.