'सुंदरी..!', 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या रिअल लाइफमधील सौंदर्य पाहून चाहते झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 07:00 AM2021-11-04T07:00:00+5:302021-11-04T07:00:00+5:30

रेश्माला दीपाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. दिवसेंदिवस तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये खूप वाढ होताना दिसते आहे.

Rang Maza Vegla Fame Deepa Aka Reshma Shinde Shared photos on Instagram | 'सुंदरी..!', 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या रिअल लाइफमधील सौंदर्य पाहून चाहते झाले क्रेझी

'सुंदरी..!', 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या रिअल लाइफमधील सौंदर्य पाहून चाहते झाले क्रेझी

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' मालिकेने कमी कालावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेचे कथानक आणि यातील पात्रांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेतील दीपाने आपल्या प्रेमळ स्वभावाने रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत दीपाची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने निभावली आहे. रेश्माला दीपाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. दिवसेंदिवस तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये खूप वाढ होताना दिसते आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे आणि ती सोशल मीडियावर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे चाहतेदेखील फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. नुकतेच  तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. रेश्मा शिंदेच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळतो आहे. एका युजरने म्हटले की, आई शपथ लय भारी दिसतेस, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, खूप सुंदर. आणखी एका युजरने लिहिले की, खूप गोड. 

रेश्मा शिंदेने हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये झळकली आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतून रेश्माला खूप लोकप्रियता मिळाली आहे.  नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत तिने काम केले आहे. 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातही ती दिसली आहे.

Web Title: Rang Maza Vegla Fame Deepa Aka Reshma Shinde Shared photos on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.