आलियासोबतच्या नात्याची रणबीरने दिली कबुली, केला हा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 16:58 IST2018-05-31T16:56:42+5:302018-05-31T16:58:02+5:30
आलिया भटसोबतच्या लिंकअपमुळेही चर्चेत आहे. आता तर त्याने एका मुलाखतीत आलियासोबतच्या नात्याचा इशाऱ्यातच स्वीकारही केलाय.

आलियासोबतच्या नात्याची रणबीरने दिली कबुली, केला हा खुलासा
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हे नेहमीच त्यांच्या लव्ह स्टोरीमुळे चर्चेत राहतात. रणबीर कपूरही याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. एकीकडे त्याने आत्तापर्यंत 10 मुलींना डेट केल्याचा खुलासा केला तर दुसरीकडे तो आलिया भटसोबतच्या लिंकअपमुळेही चर्चेत आहे. आता तर त्याने एका मुलाखतीत आलियासोबतच्या नात्याचा इशाऱ्यातच स्वीकारही केलाय.
जीक्यू इंडिया या मॅगझिनसाठी दिलेल्या मुलाखतीत रणबीरने आपल्या करिअर आणि पर्सनल लाइफबाबत अनेक खुलासे केले. त्यासोबतच त्याने इशाऱ्यातच आलियासोबतच्या नात्याचा स्वीकार केलाय. त्याला विचारण्यात आले की, तू खरंच आलियाला डेट करत आहेस का? यावर ते म्हणाला की, 'हो, हे सध्या नवीन आहे आणि मला यावर आणखी जास्त काही बोलता येणार नाही'.
तो पुढे म्हणाला की, 'एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून आलिया सध्या वाहवत जात आहे. जेव्हा मी तिचं काम बघतो, जेव्हा मी तिला अभिनय करताना बघतो. तेव्हा हे दिसतं. इतकेच नाहीतर जीवनात ती जे काही देते ते मला माझ्यासाठी घ्यायचं आहे'. अशाप्रकारे इशाऱ्यात त्याने यावर उत्तर दिले.
यासोबतच त्यासा विचारण्यात आले की, नव्याने प्रेमात पडल्यावर सर्वात चांगली गोष्ट कोणती वाटते? यावर तो म्हणाला की, हे नेहमीच आनंद देणारं असतं. एक नवा व्यक्ती नव्या गोष्टी घेऊन जीवनात येत असतो. मी संबंधांना अधिक महत्व देतो. मी आता हृदयाला जखम होणे काय आहे हे समजू शकतो, हे मी काही वर्षांपूर्वी समजू शकत नव्हतो'.
आता रणबीरच्या उत्तरांनी हे स्पष्ट झालंय की, तो आलियाला डेट करत आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. पण आता हे क्लिअर झालं आहे.