Ramcharan : लग्नाच्या १० वर्षांनंतर सुपरस्टार रामचरण आणि पत्नी उपासनाने दिली 'गुडन्युज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:13 IST2022-12-12T16:11:17+5:302022-12-12T16:13:50+5:30
साऊथ सुपरस्टार रामचरणने सोशल मीडियावरुन 'गुडन्युज' शेअर केली आहे. मेगास्टार चिरंजीवी यांनीही बातमीला दुजोरा दिला आहे.

Ramcharan : लग्नाच्या १० वर्षांनंतर सुपरस्टार रामचरण आणि पत्नी उपासनाने दिली 'गुडन्युज'
Ramcharan : साऊथ सुपरस्टार रामचरणने सोशल मीडियावरुन 'गुडन्युज' शेअर केली आहे. 'आरआरआर फेम अभिनेता रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या आयुष्यात तिसऱ्या पाहुण्याची एंट्री होणार आहे. 'श्री हनुमानजीच्या कृपेने आमच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे' अशी घोषणा त्याने सोशल मीडियावर केली. यानंतर चाहते दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
१४ जुन २०१२ साली रामचरण आणि उपासना लग्नबंधनात अडकले. हैदराबाद येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अनेक राजकीय आणि साऊथ, बॉलिवुड कलाकारांनी लग्नात हजेरी लावली. लग्नाच्या १० वर्षांनंतर दोघांच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे येणारे नवे वर्ष नक्कीच रामचरणसाठी खास असणार आहे. रामचरणचे वडील मेगास्टार चिरंजीवी यांनी देखील पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
रामचरण आणि उपासना कामिनेनी तेलगु इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. एका स्पोर्ट्स क्लबमध्ये दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर ते पाच वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांनी लग्नाचा १० वा वाढदिवस इटलीमध्ये साजरा केला होता.
रामचरणचा नुकताच 'आरआरआर' या सिनेमाने छप्परफाड कमाई केली. आगामी 'आरसी १५' मध्ये रामचरण मुख्य भुमिकेत आहे. यात किआरा अडवाणी देखील स्क्रीन शेअर करणार आहे.