यशने सुरु केलं 'रामायण'चं शूट, आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे सेटवरील फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:07 IST2025-05-29T12:06:50+5:302025-05-29T12:07:17+5:30
कोण आहेत हे आंतरराष्ट्रीय स्टंट मास्टर?

यशने सुरु केलं 'रामायण'चं शूट, आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे सेटवरील फोटो व्हायरल
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) सिनेमाचं शूट सध्या जोमात सुरु आहे. काही महिन्यांपासून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र होते. तर आता अभिनेता यशने (Yash) शूटिंगला सुरुवात केली आहे. तो सिनेमात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा दोन पार्ट मध्ये बनणार असून पहिल्या पार्टमध्ये यश आणि रणबीर यांचा सामना होणार नसल्याने दोघांचंही शूटही वेगवेगळं होत आहे. दरम्यान यशच्या सेटवरील फोटोंमध्ये आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शक गाय नॉरिसही (Guy Norris) दिसत आहेत.
'रामायण' सिनेमातील अॅक्शन दृश्य दमदार असणार यात शंका नाही. कारण सिनेमाच्या टीममध्ये आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शक गाय नॉरिस आहेत. त्यांनी 'फ्यूरियोसा: ए मॅड मॅक्स सागा', 'मॅड मॅक्स: फ्यूरी रोड' सारख्या सिनेमांमध्ये स्टंट दिग्दर्शन केलं आहे. सध्या ते भारतात असून 'रामायण'च्या दिग्दर्शनात व्यग्र आहेत. सेटवर अभिनेता यशला शॉट समजावून सांगताना ते दिसत आहेत. यामुळे सिनेमात जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार असंच दिसतंय. यश आणि गाय नॉरिस यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर पहिला भाग रिलीज होईल असा अंदाज आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. टीव्ही अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचं त्याने कन्फर्म केलं आहे. सिनेमात इतरही बरीच स्टारकास्ट आहे. सिनेमाचं बजेट ८३५ कोटी रुपये आहे.