राखी सावंत बरळली, ‘लोकांना एड्स व्हावा म्हणूनच सरकारने कंडोमच्या जाहिराती बंद केल्या’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 21:37 IST2017-12-16T16:07:55+5:302017-12-16T21:37:55+5:30
माहिती व प्रसारण मंत्रालयाने कंडोम प्रॉड््क्टच्या जाहिरातींवर बॅन आणत केवळ रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंतच या जाहिराती प्रसारित ...

राखी सावंत बरळली, ‘लोकांना एड्स व्हावा म्हणूनच सरकारने कंडोमच्या जाहिराती बंद केल्या’!
म हिती व प्रसारण मंत्रालयाने कंडोम प्रॉड््क्टच्या जाहिरातींवर बॅन आणत केवळ रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंतच या जाहिराती प्रसारित करण्याचे आदेश दिल्याने ड्रामा क्वीन राखी सावंत चांगलीच संतापली आहे. तिने चक्क सरकारच्या या निर्णयाला माझ्याविरुद्ध कटकारस्थान रचल्याचे म्हटले आहे. इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सशी बोलताना राखीने सरकारवर निशाणा साधतांना म्हटले की, जेव्हा सनी लिओनी आणि बिपाशा बसू कंडोमची जाहिरात करीत होते तेव्हा सरकारने काहीही पाऊले उचलली नाहीत. मात्र राखी कंडोमची जाहिरात करणार ही चर्चा रंगताच सरकारने एक निर्णय घेत जाहिराती रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दाखविल्या जाणार असल्याचे सांगितले. याचा अर्थ सरकार मला घाबरले, असा मी घ्यायला हवा काय?
राखीने पुढे बोलताना म्हटले की, जर टीव्ही चॅनल सरकारच्या या आदेशांचे पालन करीत असेल तर भारतात प्रत्येकालाच एड्स होईल. कारण मुले झोपतील तर त्यांना कसे समजणार की कंडोम काय आहे? त्याचा वापर कसा करीत असतात? त्यामुळे सरकारने हा निर्णय घेऊन जणू काही हेच सांगण्याचा प्रयत्न केला की, प्रत्येकालाच एड्स व्हायला हवा. कारण मुलांनी या जाहिराती बघितल्याच नाहीत, तर ते सावधगिरी कशी बाळगणार?
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राखी सावंतने कंडोमच्या जाहिरातीचे शूटिंग केले होते. या जाहिरातीविषयी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओदेखील अपलोड केला होता. या व्हिडीओमुळे राखीवर यूजर्सनी सडकून टीकाही केली होती. खरं तर राखी आणि वाद हे जणू काही सूत्रच बनले आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर वायफळ चर्चा करून राखी स्वत:ला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करीत असावी. कारण काही दिवसांपूर्वीच राखीने ‘पद्मावती’ वादात स्वत:हून उडी घेतली होती. यामुळे मला रेपच्या धमक्या मिळत असल्याचे राखीने सांगितले होते.