Rakhi Sawantचा ‘ड्रामा’ पाहून दुबईतील ‘शेख’ही शॉक्ड ; कोरोनाचा बहाणा करून काढला पळ...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 16:57 IST2021-10-31T16:55:47+5:302021-10-31T16:57:49+5:30
Rakhi Sawant Video Viral : होय, राखी सावंतचा व्हिडीओ पाहून कपाळावर हात मारून घ्याल

Rakhi Sawantचा ‘ड्रामा’ पाहून दुबईतील ‘शेख’ही शॉक्ड ; कोरोनाचा बहाणा करून काढला पळ...!
ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant ) काय करेल याचा नेम नाही. नुकतीच राखी दुबईला गेली होती. त्या ठिकाणी राखीनं जे काही केलं, ते पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल. होय, तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
तर दुबईत एका इव्हेंटदरम्यान राखी एका शेखसोबत फोटो काढताना दिसतेय. फोटो काढता काढता राखी अशी काही डिमांड करते, तो सुद्धा शॉक्ड होतो. होय, फोटो काढत असताना अचानक ती शेखचा हात पकडते आणि त्याच्याकडे गोल्डन व्हिसाची मागणी करते.
सर सर सर, दुबई गोल्डन व्हिसा,असं राखी म्हणते. यावर शेख इतका अवाक् होतो की, काय बोलावं हेच त्याला कळत नाही. यानंतर काय तर राखीपासून पिच्छा सोडवण्यासाठी चक्क खोकत खोकत कोरोनाचा बहाणा करून तो तिथून पळ काढतो. पण इतक्या सहज पिच्छा सोडेल ती राखी कुठली? त्यानंतरही राखी गुडघ्यावर बसून त्याचा हात धरुन त्याच्याकडे पुन्हा गोल्डन व्हिसा मागताना दिसते.
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
व्हिडीओत राखीने व्हाईट शिमरी रंगाचा अरेबियन स्टाईल ड्रेस घातला आहे. डोक्यावर मॅचिंग स्कार्फ आणि त्यावर क्राऊन असा तिचा पोशाख आहे.