प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 13:02 IST2025-07-18T13:01:27+5:302025-07-18T13:02:25+5:30
अभिनेत्री पत्रलेखा ऑरेंज मोनोकिनीमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. यातील आणखी एका फोटोमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखा पूलमध्ये 'लिप लॉक' करताना दिसत आहेत...

प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
‘स्त्री 2’ स्टार राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा या जोडप्याच्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. गेल्या आठवड्यात या जोडप्याने यासंदर्भात सोशल मीडियावरून माहिती दिली होती. आता लवकरच पालक होणार असलेले हे जोडपे न्यूझीलंडमध्ये बेबीमूनचा आनंद घेत आहे. या जोडप्याने त्यांच्या बेबीमूनचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
राजकुमार-पत्रलेखा यांचं स्विमिंग पूलमध्ये लिपलॉक -
पत्रलेखाने न्यूझीलंडमधील बेबीमूनचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये राजकुमार आणि पत्रलेखा स्विमिंग पूलमध्ये एकमेकांचा हातात हात घेऊन उभे असलेले दिसत आहेत. यावेळी, पत्रलेखाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसीचा ग्लो दिसून येत आहे. अभिनेत्री पत्रलेखा ऑरेंज मोनोकिनीमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. यातील आणखी एका फोटोमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखा पूलमध्ये 'लिप लॉक' करताना दिसत आहेत.
तिच्या बेबी मूनचे रोमँटिक फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, "एक वेगळ्या प्रकारची लक्झरी - स्लो टाइम, सॉफ्ट स्काय आणि वॉर्म वाटर, वैराकेई टेरेस, तुम्हाला विसरणे कठीण..."
राजकुमार-पत्रलेखा लग्नाच्या चार वर्षांनंतर पालक होणार आहेत -
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचे २०२१ मध्ये चंदीगड येथे लग्न झाले. लग्नाच्या चार वर्षांनंतर, बुधवारी (९ जुलै) या जोडप्याने प्रेग्नंसीसंदर्भात घोषणा केली. चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी या आनंदाच्या बातमीसाठी जोडप्याचे अभिनंदन केले आहे.