राजकुमार-वामिकाचा 'भूल चूक माफ' बॉक्स ऑफिसवर सुस्साट! तीन दिवसांत केली 'इतक्या' कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 11:09 IST2025-05-26T11:06:12+5:302025-05-26T11:09:37+5:30
राजकुमार राव (Rajkumar Rao)आणि वामिका गब्बी (Wamiqua Gabbi) स्टारर 'भूल चूक माफ' चित्रपटाला प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

राजकुमार-वामिकाचा 'भूल चूक माफ' बॉक्स ऑफिसवर सुस्साट! तीन दिवसांत केली 'इतक्या' कोटींची कमाई
Bhool Chuk Maaf Day 3 Box Office Collection: राजकुमार राव (Rajkumar Rao)आणि वामिका गब्बी (Wamiqua Gabbi) स्टारर 'भूल चूक माफ' चित्रपटाला प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. थिएटर आणि ओटीटी रिलीजच्या वादात अडकलेला 'भूल चुक माफ' अनेक समस्यांना तोंड दिल्यानंतर २३ मे रोजी मोठ्या बजेटमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने संथ सुरुवात केल्याची पाहायला मिळाली. मात्र, विकेंडला भूल चूक माफ चित्रपटाच्या कमाईत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रदर्शनच्या पहिल्याच शनिवारी आणि रविवारी राजकुमार रावच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला आहे. त्यात आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रविवारी 'भूल चुक माफ' ने चांगलं कलेक्शन केलं आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास १०.९४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. परंतु, यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. विकेंडचा राजकुमार-वामिकाच्या चित्रपटाचा चांगलाच फायदा मिळाल्याचं दिसत आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी भूल चूक माफ चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'भूल चूक माफ' कलेक्शन-
पहिला दिवस- ७ कोटी
दुसरा दिवस- ९.५ कोटी
तिसरा दिवस- ११.२५ कोटी
एकूण कलेक्शन- २७. २५ कोटी
करण शर्मा लिखित आणि दिग्दर्शित, ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाचं कथानक दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच चित्रपटात सीमा पाहवा, संजय मिश्रा, रघुबीर यादव आणि जाकिर हुसैन यांच्याही भूमिका आहेत.