'3 इडियट्स' सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 11:51 IST2018-06-21T11:49:46+5:302018-06-21T11:51:34+5:30

'3 इडियट्स' या सुपरडुपर हिट सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सगळंकाही ठिक राहिलं तर या गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल तुम्हाला बघायला मिळू शकतो. 

Rajkumar Hirani is planning sequel of 3 Idiots | '3 इडियट्स' सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

'3 इडियट्स' सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : '3 इडियट्स' या सुपरडुपर हिट सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सगळंकाही ठिक राहिलं तर या गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल तुम्हाला बघायला मिळू शकतो. 

मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे '3 इडियट्स' सिनेमाचा सीक्वल करण्याचा विचार करत आहेत. इतकेच नाहीतर या सिनेमासाठी त्यांनी लिखाणही सुरु केलं आहे. 

आमिर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवन यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आजही अनेकांच्या स्मरणात जसाच्या तसा आहे. आजही वेळ मिळाला की, हा सिनेमा आवडीने बघितला जातो. आता याचा सीक्वलचा विचार सुरु आहे. पण या सिनेमात आधीचेच कलाकार असणार की, आणखी कुणी हे अजून ठरलं नाहीये. 

संजूच्या प्रमोशन दरम्यान रणबीर कपूर याला विचारण्यात आले की, तुला '3 इडियट्स' च्या सीक्वलमध्ये काम करायला आवडेल का? त्यावर त्याने जराही वेळ न घालवता, 'हो का नाही'! असं उत्तर दिलं. 

राजू सर जे म्हणतील, 'ते मी डोळे बंद करुन करायला तयार आहे. तो सीक्वल असो वा आणखी काही मला त्याने फरक पडत नाही. मला राजू सर सांगतील ते मी करणार', असे तो म्हणाला.

Web Title: Rajkumar Hirani is planning sequel of 3 Idiots