मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली राधिका मदान; पापाराझींना पाहताच झाली कावरीबावरी, लपवला चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:12 IST2025-12-16T13:11:00+5:302025-12-16T13:12:01+5:30
Radhika Madan : अभिनेत्री राधिका मदान नुकतीच एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली. एका आय हॉस्पिटलमधून बाहेर पडताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. पापाराझींना पाहताच तिने त्या मिस्ट्री मॅनचा हात सोडून दिला.

मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली राधिका मदान; पापाराझींना पाहताच झाली कावरीबावरी, लपवला चेहरा
राधिका मदान तिचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत खाजगी ठेवते. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमुळे तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. राधिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राधिका एका आय हॉस्पिटलच्या बाहेर त्या मिस्ट्री मॅनचा हात धरून चालत होती. मात्र, जशी तिची नजर पापाराझींवर पडली, तसा तिने लगेच हात सोडला आणि चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती थोडी अस्वस्थ आणि नर्व्हस दिसली. त्यानंतर दोन मिनिटे थांबून तिने त्या व्यक्तीशी काही चर्चा केली आणि ती तिथून निघून गेली.
या व्हिडीओनंतर राधिकाच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी तिने डेनिम शॉर्ट्स आणि ब्राऊन रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. तिने मास्क लावला होता आणि केस मोकळे सोडले होते. दुसरीकडे, त्या मिस्ट्री मॅनने काळी पँट आणि गुलाबी टी-शर्ट घातला होता आणि त्यानेही मास्क लावला होता. राधिका सोबतीची ही व्यक्ती नेमकी कोण आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वर्कफ्रंट
राधिका मदानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, तिने २०१८ मध्ये 'पटाखा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात तिने 'चंपा कुमारी'ची भूमिका साकारली होती. त्यानंतर २०१९ मध्ये ती 'मर्द को दर्द नहीं होता' मध्ये दिसली. २०२० मध्ये तिने 'अंग्रेजी मीडियम'मध्ये काम केले, ज्यात इरफान खान आणि करीना कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. याव्यतिरिक्त तिने मोनिका ओ माय डार्लिंग, सना, कुत्ते, कच्चे लिंबू, सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ, सरफिरा, जिगरा या सिनेमांचा समावेश आहे. सध्या राधिकाकडे दोन मोठे चित्रपट आहेत. ती 'सुबेदार' आणि 'रुमी की शराफत'मध्ये दिसणार आहे. 'सुबेदार'चे चित्रीकरण सध्या सुरू आहे, तर 'रुमी की शराफत'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.