राधिका मदानने केली सर्जरी? व्हायरल व्हिडिओवर म्हणाली, "आयब्रो आणखी वर हवे होते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 16:46 IST2025-04-15T16:41:35+5:302025-04-15T16:46:41+5:30

राधिका मदानने दिलं स्पष्टीकरण, व्हिडिओ खरा की खोटा?

radhika madan reacted to her AI video where her face is looking like botox surgery | राधिका मदानने केली सर्जरी? व्हायरल व्हिडिओवर म्हणाली, "आयब्रो आणखी वर हवे होते..."

राधिका मदानने केली सर्जरी? व्हायरल व्हिडिओवर म्हणाली, "आयब्रो आणखी वर हवे होते..."

मनोरंजनविश्वात अनेक कलाकारांनी  बोटॉक्स, फिलर्स या सर्जरी केल्या आहेत. ओठ, नाक ठीक करुन घेण्यासाठी अनेक जण याची सर्जरी करुन घेतात. जे बऱ्याचदा धोकादायकही असतं आणि खर्चिकही असतं. अभिनेत्री राधिका मदानचा (Radhika Madan) बदललेल्या लूकचा व्हिडिओ व्हायरल होतोय. राधिकाने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत हा फेक व्हिडिओ असल्याचं सांगितलं आहे.

राधिका मदानचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये ती ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहे. तिचा चेहरा जरा वेगळा दिसत आहे. नाकाची सर्जरी केल्याचा लोकांनी यावरुन अंदाज लावला आणि तिला ट्रोल केलं. चांगल्या सौंदर्याची वाट लावली अशा कमेंट्स व्हिडिओवर यायला लागल्या. राधिका मदानला आता ओळखणंही कठीण झालंय अशी चर्चा सुरु झाली. राधिका मौनी रॉय कडून शकत आहे, नवा चेहरा, नवी वाईब!


राधिकाने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, "एआय चा वापर करुन आयब्रोज इतकेच वर केले? अजून थोडं करा यार...हे तर नॅचरलच वाटत आहेत." पुढे तिने स्पष्टीकरण देत लिहिले, "हा खरा व्हिडिओ नाहीए. एआय व्हिडिओ आहे."

राधिका नुकतीच अक्षय कुमारच्या 'सरफिरा' मध्ये दिसली. राधिकाचा टीव्ही ते बिग स्क्रीन असा प्रवास राहिला आहे. 'मेरी आशिकी तुमसे ही' मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली होती. 

Web Title: radhika madan reacted to her AI video where her face is looking like botox surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.