Pushpa 2: कानात झुमके, गळ्यात लिंबांच्या माळा..., समोर आलं 'पुष्पा २'चं पोस्टर; अल्लू अर्जुनचा रौद्रावतार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 02:29 PM2023-04-08T14:29:03+5:302023-04-08T14:29:51+5:30

Pushpa 2 : अल्लू अर्जुनने त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी 'पुष्पा २'चं पोस्टर शेअर केले.

Pushpa 2: Earrings in ears, garlands of lemons around the neck..., 'Pushpa 2' poster revealed; Allu Arjun's Rudra Avatar | Pushpa 2: कानात झुमके, गळ्यात लिंबांच्या माळा..., समोर आलं 'पुष्पा २'चं पोस्टर; अल्लू अर्जुनचा रौद्रावतार

Pushpa 2: कानात झुमके, गळ्यात लिंबांच्या माळा..., समोर आलं 'पुष्पा २'चं पोस्टर; अल्लू अर्जुनचा रौद्रावतार

googlenewsNext

साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या त्याच्या आगामी 'पुष्पा २' (Pushpa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे पोस्टर देखील समोर आले आहे ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा लूक खूपच थक्क करणारा आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी पोस्टर शेअर केले होते. आज म्हणजेच ८ एप्रिल रोजी अभिनेता त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी चाहत्यांपासून ते सेलेब्सपर्यंत त्यांचे अभिनंदन होत आहे.

अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्रामवर पुष्पा द रुलचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमधील त्याचा लूक खूपच वेगळा आहे, जे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनने साडी परिधान केलेली दिसत आहे. या अभिनेत्याने कानात झुमके, साडी, गळ्यात लिंबाचा हार आणि हातात बांगड्या घातलेल्या दिसत आहेत. अभिनेत्याचा हा लूक पाहून चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पोस्टरवरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 


एका यूजरने लिहिले- 'पुष्पा भाऊ जिवंत आहेत.' तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'फ्लॉवर इज नॉट फायर'. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीनेही कमेंट केली आहे. त्याने पोस्टरवर आग असलेली इमोजी पाठवली आहे.


'पुष्पा द राइज' २०२१ साली रिलीज झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शित होताच खळबळ उडवून दिली. पुष्पा हा २०२१ मधील सर्वात मोठा चित्रपट ठरला. 'पुष्पा द राइज'मध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना लीड रोलमध्ये होती. 'पुष्पा द राइज'ने जगभरात ३०० कोटींहून अधिक कमाई केली आणि यावेळीही निर्माते खूप मोठ्या बजेटमध्ये चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीचेही एक आयटम साँग असणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहे. आता हा चित्रपट 'पुष्पा द राईज'प्रमाणे कमाल दाखवतो की नाही हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Pushpa 2: Earrings in ears, garlands of lemons around the neck..., 'Pushpa 2' poster revealed; Allu Arjun's Rudra Avatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.