मावशी प्रियंकाने भाच्याला काय गिफ्ट दिलं? परिणीती चोप्राने दाखवला खास फोटो, म्हणाली-

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:20 IST2025-11-21T17:10:58+5:302025-11-21T17:20:29+5:30

प्रियंका चोप्राने परिणीती चोप्राच्या बाळासाठी खास गिफ्ट पाठवलं आहे. हे गिफ्ट येताच नीरच्या आईने खास पोस्ट लिहिली आहे

priyanka chopra nick jonas special gift to panrineeti chopra raghav chaddha son neer | मावशी प्रियंकाने भाच्याला काय गिफ्ट दिलं? परिणीती चोप्राने दाखवला खास फोटो, म्हणाली-

मावशी प्रियंकाने भाच्याला काय गिफ्ट दिलं? परिणीती चोप्राने दाखवला खास फोटो, म्हणाली-

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि तिचा पती राघव चड्ढा यांनी काही महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलाचं स्वागत केलं. नुकतंच या जोडप्याने आपल्या मुलाचे नाव 'नीर' असं ठेवल्याचं जाहीर केलं. या मुलाच्या जन्मानंतर या कपलवर शुभेच्छा आणि भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. अशातच नीरची मावशी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि प्रियंकाचा पती निक जोनास यांनीही त्यांच्या लाडक्या भाच्यावर भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. प्रियंका - निकने नीरसाठी काय पाठवलं?

परिणीतीने शेअर केला फोटो

परिणीतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रियंका आणि निकने पाठवलेल्या गिफ्ट्सचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लहान मुलांची खेळणी, कपडे आणि इतर अनेक आकर्षक वस्तू ठेवलेल्या दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना परिणीतीने एक मजेदार आणि प्रेमळ कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं की, "नीर आत्तापासूनच बिघडत चालला आहे. मिमि मावशी, निक आणि मालती दीदी, तुमचे खूप खूप धन्यवाद!" परिणीतीची ही पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे आणि ते त्यावर भरभरून कमेंट्स करत आहेत.

नीरचा अर्थ 

परिणीती आणि राघव यांनी १९ ऑक्टोबर रोजी आपल्या मुलाचं स्वागत केलं होतं. मुलाच्या जन्मानंतर सुमारे एक महिन्यांनी या जोडप्याने 'नीर' या नावाचा खुलासा केला. नाव जाहीर करताना त्यांनी संस्कृतमध्ये एक श्लोकही लिहिला होता, "जलस्य रूपम, प्रेमस्य स्वरूपम – तत्र एव नीर." (पाण्याचे रूप, प्रेमाचे स्वरूप – तोच नीर).  या जोडप्याने अजूनही बाळाचा चेहरा समोर आणलेला नाही, परंतु नाव जाहीर करताना त्यांनी बाळाच्या पायाला चुंबन घेतलेला एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला होता. नीरच्या आगमनाच्या आनंदात संपूर्ण मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title : प्रियंका चोपड़ा का परिणीति चोपड़ा के बेटे को तोहफा: प्यारी तस्वीर!

Web Summary : प्रियंका चोपड़ा और निक जोनास ने परिणीति चोपड़ा और राघव चड्ढा के नवजात बेटे नीर पर तोहफों की बौछार की। परिणीति ने उपहारों की एक तस्वीर साझा की, खिलौनों और कपड़ों के लिए आभार व्यक्त किया।

Web Title : Priyanka Chopra's Gift to Parineeti Chopra’s Son: Adorable Photo!

Web Summary : Priyanka Chopra and Nick Jonas showered love on Parineeti Chopra and Raghav Chadha's newborn son, Neer, with gifts. Parineeti shared a photo of the presents, expressing gratitude for the toys and clothes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.