वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४ दिवसांत प्रियंका चोप्रानं घेतला होता 'हा' धक्कादायक निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:21 IST2025-06-11T16:20:35+5:302025-06-11T16:21:23+5:30

वडिलांशी अतूट नातं असलेल्या प्रियंकासाठी त्यांच्या निधनाचा आघात अत्यंत दुःखदायक होता.

Priyanka Chopra Did Start Filming Mary Kom Just Four Days After Her Father's Death In June 2013 | वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४ दिवसांत प्रियंका चोप्रानं घेतला होता 'हा' धक्कादायक निर्णय!

वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४ दिवसांत प्रियंका चोप्रानं घेतला होता 'हा' धक्कादायक निर्णय!

 Priyanka Chopra: प्रियंका चोप्रानेबॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. प्रियंका आपल्या शानदार अभिनयाप्रमाणेच फिटनेस, फिगर आणि सौंदर्यासाठीही ओळखली जाते. प्रियंकाला आज कुठल्या परिचयाची गरज नाही. जगभरात तिचा चाहतावर्ग आहे.  ती केवळ ग्लॅमरसाठीच नव्हे, तर तिच्या धैर्य, जिद्द आणि कर्तृत्वासाठीही ओळखली जाते. प्रियंका ही तिचे वडील अशोक चोप्रा यांच्याही खूप जवळ होती. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही,  वडिलांच्या मृत्यूनंतर फक्त ४ दिवसांनी प्रियांका कामावर परतली होती. 

वडिलांशी अतूट नातं असलेल्या प्रियंकासाठी त्यांच्या निधनाचा आघात अत्यंत दुःखदायक होता. या कठीण काळातून तिला सावरण्यास कामामुळेच मदत झाली. कामात मग्न राहिल्यामुळे तिला दुःखावर मात करता आली. एका जुन्या मुलाखतीत प्रियंकाने सांगितले की, तिच्या वडिलांचे निधन 'मेरी कोम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालं होतं. त्यावेळी महत्त्वाच्या बॉक्सिंग सीनसाठी सेट आधीच तयार करण्यात आले होते. त्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर केवळ चार दिवसांत प्रियंकाने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली.

प्रियंका म्हणाली, "माझ्या वडिलांनाही हेच हवं होतं. मी त्या बॉक्सिंग सीनमध्ये माझं संपूर्ण दुःख ओतून दिलं". दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी प्रियंकाला वडिलांच्या निधनानंतर त्वरित कामावर येऊ नकोस, विश्रांती घे, असं सांगितलं होतं. पण, अभिनेत्री ताबडतोब कामावर परतली.  प्रियंकाला वाटलं की तिच्या वडिलांना तिचं असं घरात बसून दुःखात राहणं मंजूर नसतं. दरम्यान, १० जून २०१३ रोजी प्रियांकाचे वडील डॅा. अशोक चोप्रा यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत.

प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायच झालं तर, प्रियंका एसएस राजामौली यांच्या 'एसएसएमबी २९' या चित्रपटात महेश बाबूसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमासाठी तिनं तब्बल ३० कोटी एवढं मानधन घेतल्याची चर्चा आहे. तथापि, सिनेमाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याशिवाय, लवकरच तिचा 'हेड ऑफ स्टेट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   हा चित्रपट २ जुलै २०२५ रोजी  ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल.

Web Title: Priyanka Chopra Did Start Filming Mary Kom Just Four Days After Her Father's Death In June 2013

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.