गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 08:44 IST2025-06-13T08:39:46+5:302025-06-13T08:44:56+5:30

गुरुवारी अहमदाबादमध्ये विमान अपघातापूर्वी एका ब्रिटिश प्रवाशाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता.

Goodbye India heartbreaking last Instagram post of a British citizen before the Ahmedabad Air India plane crash | गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले

गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले

Ahmedabad Air India Plane Crash: गुरुवारी अहमदाबादमध्येएअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान एआय-१७१ कोसळून भीषण अपघात झाला. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते. हे विमान अहमदाबादवरुन लंडन येथे जात होते. मात्र काही मिनिटांतच ते कोसळले. या अपघातात विमान प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २४२ प्रवासी होते, त्यापैकी १६९ भारतीय, ७३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. दरम्यान विमानात चढण्यापूर्वीचा दोन ब्रिटिश नागरिकांचा व्हिडिओ समोर आला आहे. दोन्ही ब्रिटिश नागरिक विमानतळावर बसून हसताना आणि विनोद करताना दिसत आहेत. पण दुर्दैवाने हा त्यांचा शेवटचा व्हिडिओ ठरला. 

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण जग हादरलं आहे. या अपघातात विमानातील सर्व २४२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्यासोबत ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं तिथल्या २५ निवासी डॉक्टरांचाही मृत्यू झाला. या अपघातात जीव गमावलेल्यांपैकी एक ब्रिटिश नागरिक जेमी रे मीक होता. विमानात चढण्यापूर्वी जेमी याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेवटच्या या व्हिडिओमध्ये तो भारताला निरोप देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील दिसत आहेत. तो विमानतळाच्या आत जात होते.

व्हिडिओमध्ये, जेमी रे मीक अहमदाबाद विमानतळावर हसत हसत भारताला निरोप देताना आणि त्याच्या प्रवासाबद्दल सांगत होता. तो खूप आनंदी दिसत होते. व्हिडिओमध्ये, 'आपण विमानतळावर आहोत आणि विमान प्रवास करत आहोत. भारताला निरोप देत आहोत, १० तासांच्या फ्लाइटने लंडनला परत जात आहोत, असे मीकने म्हटलं. यावेळी मीकसोबत त्याचा जोडीदार फिओंगल ग्रीनलॉ देखील होता. व्हिडीओच्या शेवटी मीकने फिओंगलकडे पाहत आनंदाने मी परत जात आहे, असं म्हटलं. जेमी रे मीकची ही शेवटची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जेमी रे मीक आणि फिओंगल हे लंडनमध्ये आध्यात्मिक आरोग्य संस्था चालवत होते. लंडनहून आलेले हे दोघे १० दिवसांच्या वेलनेस रिट्रीटनंतर एअर इंडियाच्या विमानाने घरी परतणार होते, असे जेमी मीकच्या भावाने सांगितले. व्हॉक्सहॉलमध्ये असलेली वेलनेस फाउंड्री ही त्यांची संस्था टॅरो कार्ड आणि ऑरा रिडिंग करत असे. नेटफ्लिक्स, गुगल आणि डायर सारख्या प्रमुख ब्रँड्ससोबत त्यांची भागीदारी होती.

Web Title: Goodbye India heartbreaking last Instagram post of a British citizen before the Ahmedabad Air India plane crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.