या फोटोमुळे प्रियंकाच्या लग्नाची अफवा, सोशल मीडियातून दिले असे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 15:13 IST2018-05-01T15:12:53+5:302018-05-01T15:13:57+5:30

प्रियंकाच्या एका फोटोमुळे ही चर्चा सुरु झाली होती. शेवटी प्रियंकाने या चर्चांवर मजेशीर उत्तर दिलं आहे. 

Priyanka Chopra destroys rumor of marriage posting this picture | या फोटोमुळे प्रियंकाच्या लग्नाची अफवा, सोशल मीडियातून दिले असे उत्तर

या फोटोमुळे प्रियंकाच्या लग्नाची अफवा, सोशल मीडियातून दिले असे उत्तर

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून लग्न केल्याच्या अफवेमुळे चांगलीच चर्चेत आहे. प्रियंकाच्या एका फोटोमुळे ही चर्चा सुरु झाली होती. शेवटी प्रियंकाने या चर्चांवर मजेशीर उत्तर दिलं आहे. 

काही दिवसांपूर्वी प्रियंकाने एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत तिने एक ब्रेसलेट घातलेले दिसले. हे ब्रेसलेट नसून मंगळसूत्र असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती.   



 

प्रियंकाने या बातमीची लिंक शेअर करत खिल्ली उडवली आहे. प्रियंकाने पोस्टमध्ये लिहिले की, शांत व्हा मित्रांनो. मी जेव्हा लग्न करेन तेव्हा तुम्हाला सांगेन. 

दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्काच्या लग्नावेळी एका इव्हेंटमध्ये प्रियंकाला तिच्या लग्नाबाबत विचारले गेले होते. यावर ती म्हणाली होती की,  लग्न कधीही प्लॅन्ड नसतं. तुम्हाला योग्य व्यक्तीची गरज असते. जर मला योग्य व्यक्ती मिळाला तर मी लगेच लग्न करणार. मी सध्या अशा व्यक्तीच्या शोधात आहे.  

Web Title: Priyanka Chopra destroys rumor of marriage posting this picture