"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:53 IST2025-07-04T13:52:04+5:302025-07-04T13:53:17+5:30

निलेश साबळेंच्या पोस्टवर अनेक कलाकारांच्या कमेंट्स

pravin tarde comments in dr nilesh sabale post answer to rashichakrakar sharad upadhye | "किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?

"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?

राशीचक्रकार शरद उपाध्ये (Sharad Upadhye) आणि लेखक, अभिनेता निलेश साबळे (Nilesh Sabale) यांचा वाद चर्चेत आहे. आधी उपाध्येंनी फेसबुकवर पोस्ट करत निलेश साबळे यांच्यावर विविध आरोप केले. १० वर्षांपूर्वी 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर आपल्याला कशी वागणूक मिळाली हे त्यांनी लिहिलं. तसंच निलेश साबळेंच्या डोक्यात हवा गेल्याचाही उल्लेख केला. या सगळ्यावर निलेश साबळेने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत त्यांना नम्रपणे उत्तर दिलं. निलेश साबळेने दाखवलेल्या संयमाचं आणि त्याने ज्याप्रकारे उत्तर दिलं त्याचं आता इंडस्ट्रीतील कलाकारांकडून कौतुक होत आहे. अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडेनेही त्याच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

निलेश साबळेने काल इन्स्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केले. यात त्याने शरद उपाध्येंचे सर्व मुद्दे खोडून काढले. तसंच आपण त्यांचा आजही आदरच करतो हेही सांगितले. साबळेच्या या पोस्टवर प्रवीण तरडेंनी कमेंट करत लिहिले, "किती सुंदर व्यक्तं झालायेस डॉक्टर .. समोरच्या व्यक्तीला न दुखवता मुद्दा कसा मांडावा हे तु दाखवून दिलेस.. तु एक नम्र कलाकार आहेस आणि कायम तसाच रहा".

तसंच सलील कुलकर्णी यांनीही कमेंट करत लिहिले,"शांतपणे....प्रगल्भपणे बोललास... तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे...गडहिंग्लज ला तू कॉलेज मध्ये असताना माझ्या मैफिलीला येऊन भेटला होतास..तेव्हापासून जवळून पाहिलं आहे तुला....तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे...छान होऊ दे तुझा चित्रपट ..लवकर भेटू"

निलेश साबळेंना मराठी इंडस्ट्रीतून अनेक कलाकारांकडून पाठिंबा मिळाला आहे. सुकन्या मोने, प्रसाद जवादे, अभिजीत केळकर, शिल्पा नवलकरसह काही कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. शरद उपाध्ये यांनी सहा वर्षांपूर्वीही निलेश साबळेवर अशीच टीका केली होती. म्हणूनच हे पहिल्यांदा घडलेलं नाही म्हणून उत्तर देत असल्याचं निलेशने व्हिडिओत स्पष्ट केलं. 

Web Title: pravin tarde comments in dr nilesh sabale post answer to rashichakrakar sharad upadhye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.