Video: महाशिवरात्रीला मंजिरी ओकने बनवली चक्क बर्फाची पिंड, प्रसादच्या बायकोचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:25 IST2026-02-16T16:24:45+5:302026-02-16T16:25:07+5:30

मराठी अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने महाशिवरात्रीची घरीच पूजा केली. मात्र मंजिरीने महाशिवरात्रीसाठी खास बर्फाची पिंड बनवली होती. 

prasad oak wife manjiri oak made ice sculpture of mahadev shared video | Video: महाशिवरात्रीला मंजिरी ओकने बनवली चक्क बर्फाची पिंड, प्रसादच्या बायकोचं होतंय कौतुक

Video: महाशिवरात्रीला मंजिरी ओकने बनवली चक्क बर्फाची पिंड, प्रसादच्या बायकोचं होतंय कौतुक

संपूर्ण देशभरात रविवारी(१५ फेब्रुवारी) महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. अनेक सेलिब्रिटींनीही महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराची पूजा केली. कुणी शंकराच्या दर्शनासाठी मंदिरात गेलं तर कुणी घरीच बेल अर्पण करून महादेवाचं पूजन केलं. मराठी अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने महाशिवरात्रीची घरीच पूजा केली. मात्र मंजिरीने महाशिवरात्रीसाठी खास बर्फाची पिंड बनवली होती. 

मंजिरीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन महाशिवरात्रीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शंकराच्या पिंडीची पूजा करताना दिसत आहे. काही तरी नवीन प्रयोग म्हणून मंजिरीने चक्क बर्फाची पिंड बनवली होती. हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणते, "काल बर्फाची पिंडी बनवली होती . ही idea माझी नाही पण आवडली म्हणून केली. आणि मग त्यावर अगदी बेलपत्रा पासून सगळी घरची फुलं व्हायली. तुम्ही काय काय केलंत काल? हर हर महादेव". मंजिरीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अमृता खानविलकर आणि सावनी रविंद्र यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. 


दरम्यान, प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहे. ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात. मंजिरी आणि प्रसाद त्यांचे हटके रील सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतंच त्यांचा मोठा मुलगा सार्थकचा साखरपुडा पार पडला. लवकरच प्रसाद-मंजिरीच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. 

Web Title : मंजिरी ओक ने महाशिवरात्रि पर बर्फ का शिवलिंग बनाया; सेलेब्स ने की प्रशंसा।

Web Summary : प्रसाद ओक की पत्नी, मंजिरी ने घर पर बर्फ का अनूठा शिवलिंग बनाकर महाशिवरात्रि मनाई। उन्होंने इंस्टाग्राम पर इसका एक वीडियो साझा किया, जिसे अमृता खानविलकर और सावनी रवींद्र जैसी हस्तियों से प्रशंसा मिली। हाल ही में दंपति के बेटे की सगाई हुई।

Web Title : Manjiri Oak creates ice Shivling for Mahashivratri; praised by celebrities.

Web Summary : Prasad Oak's wife, Manjiri, celebrated Mahashivratri by creating a unique ice Shivling at home. She shared a video of the same on Instagram, receiving praise from celebrities like Amruta Khanvilkar and Savani Ravindra. The couple's son recently got engaged.