कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:09 IST2025-12-03T10:09:00+5:302025-12-03T10:09:46+5:30
प्राजक्ताच्या लग्नातील काही खास क्षण समोर आले आहेत. अशातीलच एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
मराठी कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला. शंभुराज खुटवड यांच्यासह प्राजक्ताने मंगळवारी(२ डिसेंबर) लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. तिच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. प्राजक्ताच्या लग्नातील काही खास क्षण समोर आले आहेत. अशातीलच एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
प्राजक्ताच्या लग्नातील कन्यादान करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत लग्नाचे विधी सुरू असल्याचे दिसत आहे. प्राजक्ताचे आईवडील तिचे कन्यादान करत असल्याचं दिसत आहे. कन्यादान होताच प्राजक्ता भावुक झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. प्राजक्ताला पाहून तिचे आईवडीलही भावुक होतात. या भावुक करणाऱ्या क्षणी प्राजक्ता आणि तिच्या आईवडिलांच्या डोळ्यांतही पाणी दिसत आहे. प्राजक्ताच्या लग्नातले आणखी काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मंगलाष्टक झाल्यानंतरही अभिनेत्री भावुक झाली होती.
प्राजक्ता हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. याशिवाय अन्य काही मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. आता प्राजक्ताने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.