अभिनेत्री भाग्यश्रीच्या मुलीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल, बॉलिवूडसाठी सज्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 15:34 IST2018-06-26T15:33:20+5:302018-06-26T15:34:20+5:30

पहिल्या सिनेमानंतर तिने काही सिनेमांमध्ये काम केलं आणि लगेच लग्न करुन संसार साधला. आता भाग्यश्रीची मुलगी सोशल मीडियात चर्चेत आली आहे. 

Pictures of actress Bhagyashree's daughter's social media viral, ready for Bollywood? | अभिनेत्री भाग्यश्रीच्या मुलीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल, बॉलिवूडसाठी सज्ज?

अभिनेत्री भाग्यश्रीच्या मुलीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल, बॉलिवूडसाठी सज्ज?

मुंबई : 'मैने प्यार किया' या सिनेमातून सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी भाग्यश्री तुम्हाला चांगलीच आठवत असेल. पहिल्याच सिनेमातून भाग्यश्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. पहिल्या सिनेमानंतर तिने काही सिनेमांमध्ये काम केलं आणि लगेच लग्न करुन संसार साधला. आता भाग्यश्रीची मुलगी सोशल मीडियात चर्चेत आली आहे. 

एकीकडे मोठमोठ्या स्टारची मुलं-मुली बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहेत. श्रीदेवीची मुलगी जान्हवी, सैफची मुलगी सारा यांची बॉलिवूड एन्ट्री झाली आहे. त्यात आता भाग्यश्रीची मुलगीही सिने इंडस्ट्रीत येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. इतकेच काय तर तिचे फोटोही सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत. 

अवंतिका दसानी असं भाग्यश्रीच्या मुलीची नाव आहे. इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या इव्हेंट्सचे फोटो शेअर करुन ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अवंतिकाने लंडनच्या कॅस बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे. एकीकडे तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची चर्चा होतीये तर दुसरीकडे ती वडीलांप्रमाणे बिझनेसमध्ये जाणार असेही बोलले जात आहे. 

भाग्यश्रीला एक मुलगाही आहे. अभिमन्यू असं त्याचं नाव असून तो सुद्धा पुढील वर्षी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. अभिमन्यू प्रमाणे अवंतिकानेही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करावी असे बोलले जात आहे.  

Web Title: Pictures of actress Bhagyashree's daughter's social media viral, ready for Bollywood?