Year Ender 2025: एकापेक्षा एक 'धुरंधर' खलनायकांनी गाजवलं बॉक्स ऑफिस, अक्षय खन्नाच नाही तर 'या' कलाकारांचीही चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:35 IST2025-12-19T12:24:19+5:302025-12-19T12:35:45+5:30
२०२५ मध्ये बिग स्क्रीन गाजवणारे खलनायक कोण?

२०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी काहीच दिवस राहिले आहेत. या वर्षात मनोरंजनविश्वामध्ये अनेक नायक खलनायक म्हणून प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या खलनायकी अवतारामुळे चित्रपट चांगलेच गाजले.

अक्षय खन्ना, ज्युनिअर एनटीआर ते रितेश देशमुख अशा अनेक कलाकारांनी यावेळी आपल्या व्हिलेन रोलमधून सर्वांना चकित केलं.

१० एप्रिल रोजी आलेला सनी देओलचा 'जाट'. या सिनेमात रणदीप हुड्डाने राणातुंगा नावाच्या खतरनाक खलनायकाची भूमिका साकारली. सनी देओलपेक्षा रणदीपचीच जास्त चर्चा झाली.

मे महिन्यात आलेला 'रेड २'. यामध्ये आयकर अधिकारी अजय देवगणसमोर यावेळी रितेश देशमुख व्हिलनच्या भूमिकेत होता. नेत्याच्या भूमिकेत दिसलेल्या रितेशची स्टाईल प्रेक्षकांना आवडली.

तसंच यावर्षी आलेल्या 'वॉर २'मध्ये ज्युनिअर एनटीआरने खलनायक बनून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने हृतिक रोशनला टक्कर देणारे अॅक्शन सीन्स आणि डान्सही केला.

'स्त्री' सिनेमापासून एकापेक्षा एक हिट देणाऱ्या मॅडॉक फिल्म्सचा 'थामा' सिनेमा यावर्षी आला. आयुष्मान खुराना-रश्मिकाच्या या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकी भूमिकेत भाव खाऊन गेला.

तर आता सध्याचा खलनायक म्हटलं तर अक्षय खन्नाचं नाव येतंच. आधी 'छावा'मधील औरंगजेब आणि आता 'धुरंधर'मधला रहमान डकैत भूमिकेतून त्याने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणलं.
















