नीता अंबानींचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट कोण आहे माहितीये? एका लूकसाठीचं मानधन ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 13:05 IST2022-01-19T12:50:02+5:302022-01-19T13:05:48+5:30

Nita ambani:अभिनेत्री हेलन यांनी मिकी कॉन्ट्रॅक्टर यांना मेकअप आर्टिस्ट होण्याचा सल्ला दिला होता.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी कुटुंबाचं कायम नाव घेतलं जातं. त्यामुळे हे कुटुंब सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत असतं. यामध्येच नीता अंबानी यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

कोट्यावधींची मालकीण असलेल्या नीता अंबानी त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलसोबतच ग्लॅमरस लूकमुळेही चर्चेत असतात.

सोशल मीडियावर त्यांच्या स्टाइल स्टेटमेंटचं कायम कौतुक होत असतं. त्यामुळेच नीता अंबानींचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी त्यांचा मेकअप नेमकं कोण करतं?, त्यांची फी किती? हे जाणून घेऊयात.

नीता अंबानी यांचा एक पर्सनल मेकअप आर्टिस्ट असून ते प्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्टदेखील आहे. आतापर्यंत त्यांनी नीता अंबानींसह अन्य दिग्गजांचाही मेकओव्हर केला आहे.

नीता अंबानींच्या मेकअप आर्टिस्टचं नाव मिकी कॉन्ट्रॅक्टर(Mickey Contractor) असं आहे.

मिकी, नीता अंबानींसह त्यांच्या घरातील अन्य सदस्यांचेही मेकओव्हर करुन देतात. यात अनेकदा इशा आणि श्लोकादेखील मिकीकडून मेकओव्हर करुन घेतात.

मिकी यांनी आतापर्यंत करीना कपूर-खान, ऐश्वर्या राय- बच्चन, दिपिका पदुकोण, अनुष्का शर्मा यांसारख्या अभिनेत्रींचाही मेकओव्हर केला आहे.

मिकी यांनी आतापर्यंत ‘हम आपके हैं कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो न हो’, ‘मोहब्बतें’, ‘माई नेम इज खान’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘डॉन’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘गुड न्यूज’, ‘अंग्रेजी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे.

मिकी कॉन्ट्रॅक्टर हे एका व्यक्तीच्या मेकओव्हरसाठी तब्बल ७५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत मानधन घेतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्री हेलन यांनी मिकी कॉन्ट्रॅक्टर यांना मेकअप आर्टिस्ट होण्याचा सल्ला दिला होता. मिकी त्यांच्या स्ट्रगलिंग काळात हेलन यांच्या हेअर ड्रेसरचं काम करायचे.

मिकी यांना अनेक पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आलं आहे.