माझ्या शिक्षकाने पँटीत घातला होता हात, ते आठवले की आजही वाटते भीती, सांगतेय मुनमुन दत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 19:54 IST2021-04-03T19:33:52+5:302021-04-03T19:54:20+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता या व्यक्तिरेखेमुळे मुनमुन दत्ताला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
मुनमुनचे लहानपणी लैंगिक शोषण झाले होते याविषयी तिेने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते.
मुनमुनने सोशल मीडियावर एक काळ्या रंगाचा फोटो शेअर केला होता. त्यात #MeToo असे लिहिले होते. यात तिने तिच्या आयुष्यात आलेल्या वाईट अनुभवाविषयी सांगितले होते.
जगभरातील अनेक महिला समोर येऊन त्यांच्या आयुष्यात घडलेल्या कटू अनुभवाविषयी सांगत आहेत. पुरुषांनी आपल्या घरातील आई, बहीण, मुलगी, काम करणारी महिला यांना विश्वासात घेऊन त्यांच्या आयुष्यातील या कटू सत्याविषयी जाणून घ्यावे... त्यांच्या कथा ऐकल्यावर पुरुषांना आश्चर्याचा धक्का बसेल यात काहीच शंका नाही.
माझ्या आयुष्यात घडलेल्या त्या घटना आठवल्या की, आजही माझ्या अंगावर काटे येतात आणि डोळ्यांतून आपोआप पाणी येते.
माझ्या घराच्या जवळ राहाणारे काका मला ज्याप्रकारे पाहायचे, त्याचा विचार केला तरी मला भीती वाटते.
मी बाळ असताना मला रुग्णालयात पाहायला आलेल्या एका पुरुषाने मी 13 वर्षांची असताना मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. कारण मी आता मोठी होत होती आणि माझ्या शरीरात बदल होत होते.
माझे ट्यूशन घेणाऱ्या एका शिक्षकाने तर त्याचा हात माझ्या पँटीत घातला होता.
माझे आणखी एक शिक्षक ज्यांना मी राखी बांधली होती, ते तर मुलींच्या ब्रा स्ट्रीप्स ओढायचे आणि त्यांच्या छातीवर मारायचे.
माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या असल्या तरी आई-बाबांना याविषयी कसे सांगायचे हा नेहमीच प्रश्न होता. या सगळ्यामुळे पुरुषांविषयी मनात रागाची भावना निर्माण झाली होती. पण आज या आंदोलनात सामील होऊन माझ्या मनातील गोष्टी लोकांसमोर मांडल्याने मी खूश आहे.