निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 20:51 IST2025-12-30T20:13:03+5:302025-12-30T20:51:11+5:30
Khushi Mukherjee Suryakumar Yadav: सूर्यकुमार मला सतत मेसेज करायचा, असं खुशीने सांगितलं आहे

Khushi Mukherjee Suryakumar Yadav:
मॉडेल आणि अभिनेत्री खुशी मुखर्जी कायमच तिच्या बोल्डनेस आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. यावेळी खुशीने थेट भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक दावा केला आहे.

एका उद्धाटनाच्या कार्यक्रमादरम्यान पापाराझींने तिला प्रश्न विचारला. तेव्हा ती म्हणाली, "मला क्रिकेटरला डेट करायचं नाही. सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा. आता आमच्यात बोलणं होत नाही."

खुशी मुखर्जीने केलेल्या दाव्यामुळे सारेच अवाक् झाले. तिच्या या विधानामुळे सोशल मीडियावरही खळबळ माजली. पण अशी विधाने किंवा सनसनाटी गोष्टी करण्याची ही खुशीची पहिलीच वेळ नाही. आधीही तिने असे केले आहे.

ऐन दिवाळीमध्ये एका अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या अभिनेत्रीने भररस्त्यात लोकांवर फटाके फेकल्याने ती चांगलीच चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री इतर कुणीही नसून खुशीच होती.

दिवाळीच्या धामधुमीत मुंबईच्या रस्त्यावर खुशीने चांगलाच गोंधळ घातला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये खुशी भररस्त्यात फटाका दुकानदारासोबत आणि पोलिसांसोबत वाद घालताना दिसली होती.

रिपोर्टनुसार, मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात ही घटना घडली होती. अभिनेत्रीच्या मर्सिडीज कारला कुणीतरी धडक दिली होती. त्यानंतर संतापून खुशीने रस्त्यावर गोंधळ घालत फटाके फेकले होते.

याआधी खुशी मुखर्जीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एका डायरेक्टरने तिला मीटिंगसाठी बोलावलं. ती एकटीच त्याच्या ऑफिसमध्ये गेली. काही वेळाने दिग्दर्शक तिला दुसऱ्या एका ठिकाणी घेऊन गेला.

दिग्दर्शक खुशीला घेऊन एका निर्मात्याकडे गेला होता. दिग्दर्शकाने आधीच त्या निर्मात्याकडून एक लाख रुपये घेतले होते. "तू आज रात्री माझ्यासोबत राहणार आहेस", असं निर्माता खुशीला म्हणाला होता.

निर्मात्याने असं म्हणताच खुशी प्रचंड घाबरली होती. तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिने निर्मात्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि फार काही घडण्याआधीच तिने तिथून पळ काढला होता.

याशिवाय, खुशी अनेक वेळा विचित्र कारणांमुळे चर्चेत आली आहे. सार्वजनिक ठिकाणी खूपच रिव्हिलिंग कपडे घालणे, साडीच्या आत ब्लाउज न घातल्याने ट्रोल होणं अशा गोष्टीही तिच्यासोबत झाल्या आहेत.
















